

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत वेगळीच भीती दर्शवली आहे. WHO कडून काही नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमायक्रॉन आपल्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. असे डब्ल्यूएचओ म्हटले आहे (omicron)
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन जगभरात वणव्यासारखा पसरत असल्याच्या पार्श्वभुमीवर WHO चे आपात्कालीन विभागाचे अधिकारी कॅथरिन स्मॉलवूड यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे वृत्त कॅलिफोर्निया टाइम्सने दिले आहे. (omicron)
"ओमायक्रॉन ज्या वेगाने पसरत आहे तितका तो प्रसारित होण्याचा आणि प्रतिकृती बनवण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ओमायक्रॉन प्राणघातक आणि संभाव्य प्राणघातक आहे. पण तो डेल्टा पेक्षा थोडा कमी प्राणघातक आहे," असे स्मॉलवूड यांनी कॅलिफोर्निया टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
त्याच्या कमी तीव्रतेमुळे, शास्त्रज्ञांना आशा आहे की ओमायक्रॉन शक्यतो साथीच्या रोगावर मात करू शकेल आणि जनजीवन पूर्वपदावर आणेल. परंतु, स्मॉलवूड यांच्या म्हणण्यानुसार, महामारीच्या सुरुवातीपासून युरोपमध्ये १० कोटी हून अधिक कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे आणि २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात ५० लाखांहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
फान्सच्या संशोधकांनी कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट शोधला आहे, बहुधा तो मुळचा कॅमेरोनियनचा असावा आणि त्याचे तात्पुरते 'IHU' असे नामकरण झाले आहे. ही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
B.1.640.2 असे नामकरण झालेल्या या व्हेरियंटमुळे फ्रान्समध्ये १२ लोक बाधित झाले आहेत. यात ४६ म्युटेशन्स आणि ३७ डिटेशन्स असल्याचे फ्रान सरकारने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. पण अद्याप या अभ्यासाला पुष्टी मिळालेली नाही.
फ्रान्समध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी एका दिवशी येथे विक्रमी २,७१,६८६ रुग्णांची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तसेच यामुळे वाहतूक, शाळा आणि अन्य सेवांमध्ये अडथळा आला आहे. या पार्श्वभूमीवर फान्स सरकार अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण ९५ टक्के आहे. तर नोव्हेंबरच्या अखेरीस डेल्टा बाधित रुग्णांचे प्रमाण ९९.५ टक्क्यांहून अधिक होते.
हे ही वाचा :