

पुणे : भारतात एकेकाळी लाखो हत्ती होते. मात्र गेल्या दहा वर्षांत हस्तिदंताच्या तस्करीसाठी झालेल्या शिकारीमुळे त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. देशात हत्तींची संख्या महाराष्ट्रात सर्वांत कमी आहे. राज्यात केवळ 6 हत्ती उरले आहेत. तर कर्नाटक राज्यात 6 हजार हत्ती शिल्लक आहेत. त्यामुळे सरकारने आत्ता हत्तींच्या कानावर मायक्रोचिप बसवून त्यांची खरी गणना सुरू केली आहे.
भारतात झपाट्याने कमी होणा-या हत्तींबाबत पर्यावरण मंत्रालयाने हत्ती प्रकल्प 1992 मध्ये हाती घेतला त्याला यंदा 31 वर्षे पूर्ण झाली. या प्रकल्पांतर्गंत 11 राज्यात हत्तींसाठी संरक्षणगृहे स्थापन करण्यात आली. या ठिकाणी सुमारे 21 हजार हत्ती देखरेखीखाली सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, जंगलात नेमके किती हत्ती शिल्लक आहे, याची गणना 2012 नंतर पुन्हा 2017-18 मध्ये झाली तेव्हा देशाच्या विविध राज्यांत केवळ 28 हजार हत्ती शिल्लक असल्याचे समजले.
केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 27 हजार 312 हत्ती आहेत. यात सर्वाधिक संख्या कर्नाटक, आसाम, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड, मेघालय या राज्यांत आहे. कर्नाटकात सर्वाधिक 6 हजार हत्ती आहेत, तर सर्वात कमी महाराष्ट्रात 6 हत्ती आहेत. त्या पाठोपाठ मिझोराम 7, मध्य प्रदेश 7, गुजरात 10 हत्ती शिल्लक आहेत
हत्ती हे साधारणपणे जून ते नोव्हेंबर या उन्हाळ्याच्या काळात असताना स्थलांतर करतात. नद्या व ज्यामधील पाणी आटणार नाही, अशा अन्य जलस्रोतांच्या जवळील ठिकाण ते अधिवासासाठी निवडतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते जून महिन्यांत हत्तींचे कळप पुन्हा मूळ वसतिस्थानी परततात. स्थलांतर हे उन्हाळ्याच्या काळात होत असल्याने अन्नाचा मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन मोठ्या कळपातून हत्ती कुटुंबासह वेगळे होतात. अशा कुटुंबाच्या कळपाचे नेतृत्व हत्तीणी करतात.
आफ्रिकन व आशियाई हत्तींची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिकार. हस्तिदंताच्या चोरट्या व्यापारासाठी आफि—कन हत्तींची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. अमेरिका, चीन, थायलंड आणि हाँगकाँगमध्ये हस्तिदंताची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बेकायदा व्यापाराला चालना मिळते. हत्तींच्या बचावासाठी या व्यापाराला पायबंद घालणे हाच सर्वांत प्रभावी व परिणामकारक उपाय असल्याचे निरीक्षण 'वर्ल्ड वाइड फंड'ने नोंदविले आहे.
आशियायी हत्तींना सर्वांत मोठा धोका अधिवासाचा आहे. वाढत्या मानवी वस्त्यांमुळे घनदाट जंगले आक्रसत चालल्याने हत्तींच्या हक्काचा निवारा नष्ट होत आहे. हत्ती व मानवातील संघर्षात हत्तींचा बळी जात आहे. हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे. रेल्वेखाली येऊन हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. वीजप्रवाहामुळेदेखील हत्तींचे सर्वाधिक मृत्यू होतात.
(2017-18 गणनेनुसार)
कर्नाटक : 6,049
आसाम : 5,719
केरळ : 3,054
तामिळनाडू : 2,761
ओडिशा : 1,976
उत्तराखंड : 1,839
मेघालय : 1,754
अरुणाचल : 1,614
झारखंड : 6,79
नागालँड : 4,46
छत्तीसगड : 2,47
उत्तर प्रदेश : 2,32
प. बंगाल : 1,94
त्रिपुरा : 102
आंध— प्रदेश : 65
बिहार : 25
गुजरात : 10
मध्य प्रदेश : 07
मिझोराम : 07
महाराष्ट्र : 06
हेही वाचा