

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता रेल्वे प्रवाशांना पीएनआर स्टेटस आणि लाइव्ह ट्रेन स्टेटस पाहण्यासाठी रेल्वेच्या १३९ नंबरला कॉल करण्याची किंवा IRCTC ची वेबसाईट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण प्रवाशांना लाइव्ह ट्रेन स्टेटस आणि पीएनआर स्टेटस आपल्या व्हॉट्स ॲपवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना व्हॉट्स ॲपवरून जेवणही ऑर्डर (Food In Trains) करता येणार आहे. अनेक प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याच्या स्मार्टफोनवर पीएनआर स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस आणि रेल्वेसंबंधी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
(Food In Trains) भारतीय रेल्वे प्रवाशांना PNR स्टेटस, ट्रेन स्टेटस, पूर्वीच्या रेल्वे स्टेशनचे तपशील, आगामी स्टेशन्स आणि ट्रेन प्रवासाचे इतर तपशील मिळवण्यासाठी Whats App चॅटबॉट उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हॉट्स ॲप चॅटबॉटमध्ये फक्त 10-अंकी पीएनआर नंबर टाकावा लागेल आणि सर्व माहिती मिळवावी लागेल.
– Railofy चा WhatsApp चॅटबॉट नंबर – +91-9881193322 तुमच्या फोन संपर्कांमध्ये सेव्ह करा.
– आता तुमच्या फोनवर व्हॉट्स ॲप ॲप्लिकेशन अपडेट करा.
– WhatsApp उघडा आणि तुमची संपर्क सूची रीफ्रेश करा.
– Railofy ची चॅट विंडो शोधा आणि उघडा.
– तुमचा 10-अंकी पीएनआर नंबर एंटर करा आणि तो Whats App चॅटमध्ये पाठवा.
– Railofy चॅटबॉट तुम्हाला तुमच्या ट्रेन प्रवासाविषयी सूचना आणि रिअल-टाइम अपडेट्ससह सर्व तपशील पाठवेल.
– तुम्ही तुमच्या ट्रेनच्या प्रवासाबद्दल आणि व्हॉट्स ॲपवर स्टेटसबद्दल लाइव्ह अपडेट्स आणि अलर्ट मिळवण्यासाठी प्रवासापूर्वी PNR नंबर देखील पाठवू शकता.
आयआरसीटीसी प्रवासी ट्रेनमधून प्रवास करताना त्यांचे जेवण ऑर्डर करू शकतात. IRCTC ॲप झूप वापरून, प्रवासी ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकतात आणि ते सीटवरच मिळवू शकता.
Zoop वापरून ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनवर Whats App चॅटबॉट नंबर +91 7042062070 सेव्ह करा. किंवा [https://wa.me/917042062070] वर नेव्हिगेट करा.
– तुमच्या WhatsApp मध्ये Zoop चॅटबॉट उघडा.
– तुमचा 10-अंकी पीएनआर क्रमांक प्रविष्ट करा.
– पुढे, तुम्हाला जेथून खाद्यपदार्थ मागवायचे आहेत. ते आगामी स्टेशन निवडा.
– झूप चॅटबॉट तुम्हाला जेवण कोणत्या रेस्टॉरंटमधून निवडण्यासाठी पर्यायांचा एक संच देईल.
– जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर आणि ऑनलाइन व्यवहार पूर्ण केल्यानंतर
– तुम्ही चॅटबॉटवरून तुमच्या आवडत्या पदार्थांची माहिती घेऊ शकता.
– निवडलेल्या स्थानकावर पोहोचल्यानंतर झूप तुमचे जेवण तुम्हाला पोहोच करेल.
हेही वाचा :