चीनमधील 'लष्करी उठाव' अफवाच : क्षी जिनपिंग यांची कार्यक्रमांना हजेरी China rumors of a coup | पुढारी

चीनमधील 'लष्करी उठाव' अफवाच : क्षी जिनपिंग यांची कार्यक्रमांना हजेरी China rumors of a coup

चीनमधील 'लष्करी उठाव' अफवाच - क्षी जिनपिंग यांची कार्यक्रमांना हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : China rumors of a coup – मध्य आशियाच्या दौऱ्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ११ दिवसांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे चीनमधील लष्करी उठावाच्या बातम्या अखेर अफवाच ठरल्या आहेत. बीजिंगमध्ये क्षी जिनपिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या महत्त्वाच्या विकास कामांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

जिनपिंग ११ दिवसांपूर्वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या उजबेकिस्तान येथील परिषदेला उपस्थित होते; पण या परिषदेनंतर चीनमध्ये परतल्यानंतर त्यांची कोणत्याच कार्यक्रमाला उपस्थिती नव्हती. यातून चीनमध्ये लष्करी उठाव झाला असून, क्षी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याच्या चर्चा ट्विटरवर सुरू झाल्या. ट्विटरवर यामुळे क्षी जिनपिंग हा ट्रेंडच सुरू झाला होता. यावर अधिकृतरीत्या कोणताच खुलासा न झाल्याने या चर्चा अधिकच वाढत गेल्या होत्या. काही युजर्सनी बीजिंगकडे चिनी सैन्य कूच करत असल्याचे कथित व्हिडिओही शेअर केले होते; पण जिनपिंग ११ दिवसानंतर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने उठावाच्या चर्चा या अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा  : 

Back to top button