CISF Recruitment 2022 | 'सीआयएसएफ'मध्ये ५४० पदांची भरती, आजचं करा अर्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात; पण नोकरी मिळत नाही, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सीआयएसएफ-२०२२ मध्ये (CISF Recruitment 2022) सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरीयल)ची भरती होतेय. दोन्ही मिळून ५४० पदे रिक्त आहेत. वाचा कुठे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, काय पात्रता आहे, कुठे अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) -२०२२ मध्ये सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरीयल)ची भरती होतेय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खालील सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) वेतनस्तर-५ (वेतनश्रेणी रु. २९, २०० ९२,३००/-) मध्ये, आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल) वेतन स्तर-४ (वेतनश्रेणी रू. २५,५००-८१,१०० मध्ये) हंगामी पदे भरण्यासाठी भारतीय नागरिक असलेल्या पुरूष आणि महिलांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल) पदासाठी श्रेणीनिहाय रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत ज्या भरतीच्या कोणत्याही वेळी किंवा टप्प्यावर वाढू किंवा कमी होऊ शकतात.
पदाचे नाव – सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर)
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर या पदासाठी एकूण १२२ जागांसाठी भरती होणार आहे. या १२२ मध्ये पुरुषांसाठी ९४, महिलांसाठी १० आणि डिपार्टमेंटल (एलडीसीई) साठी अठरा जागा आहेत.
खुला वर्ग -५७
अनुसुचित जाती -१६
अनुसुचित जमाती – ८
इतर मागास वर्ग -३१
आर्थिक दृष्ट्या दुर्बल -१०
अशा प्रकारे जातिनीहाय जागांची विभागणी केली आहे..
CISF Recruitment 2022 पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल)
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल) या पदासाठी एकुण ४१८ जागांसाठी भऱती होणार आहे. या ४१८ मध्ये पुरुषांसाठी ३१९, महिलांसाठी ३६ आणि डिपार्टमेंटल (एलडीसीई) साठी ६३ जागा आहेत.
खुला वर्ग -१८२
अनुसुचित जाती -६१
अनुसुचित जमाती – २९
इतर मागास वर्ग -११२
आर्थिक दृष्ट्या दुर्बल -३४
अशा प्रकारे जातिनीहाय जागांची विभागणी केली आहे..
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबरपर्यंत आहे.
संपूर्ण तपशीलासाठी सीआयएसएफची वेबसाईट म्हणजे https://cisfrectt.in ला भेट द्या. आणि आजचं जॉबसाठी अर्ज करा.
Service to Humanity-Beyond the mandate#CISF personnel saved the life of a pax who fell unconscious due to cardiac arrest @ Chennai Airport. He was administered CPR which improved his pulse rate & was shifted to hospital.#PROTECTIONandSECURITY@HMOIndia@MoCA_GoI@AAI_Official pic.twitter.com/IlGpxOVrbL
— CISF (@CISFHQrs) September 25, 2022