

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवस पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची लव्हस्टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. माझ्या प्रेमासाठी नेपाळमार्गे भारतात आल्याचा दावा ती करत आहे. आता सीमा हैदर प्रमाणेच एक भारतीय विवाहित महिला आपल्या फेसबूक फ्रेंडला भेटण्यासाठी 'सीमा' ओलांडत पाकिस्तानमध्ये गेल्याचे उघड झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील असे 'एआरवाय न्यूज'ने दिले आहे.. जाणून घेवूया या online Love Story विषयी…
राजस्थानमधील भिवडी जिल्ह्यातील अरविंद त्याची पत्नी अंजू आणि मुलांसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. अंजूची पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तरुण नसरुल्ला याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. काही दिवसांमध्ये या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तिने पती अरविंदला जयपूरमध्ये नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगितले. मात्र रविवारी अंजू सीमेपलीकडे गेल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळाल्यानंतर अरविंदला धक्काच बसला.
अरविंदने सांगितले की, अंजूने त्याच्याशी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. रविवारी तिने दुपारी चार वाजता फोन केला होता. यावेळी तिने आपण लाहोरमध्ये असल्याचे सांगितले. तसेच दोन-तीन दिवसांत परत येणार असल्याचीही माहिती दिली. अंजूने परदेशात नोकरीसाठी २०२० मध्ये पासपोर्ट बनवला होता. गुरुवारी अंजू जयपूरला जाण्याच्या बहाण्याने तिच्या भिवडी येथील घरातून निघून गेली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसरुल्ला याला भेटण्यासाठी खैबर पख्तुनख्वा येथे गेल्याचे वृत्त पाकिस्तानमधील 'एआरवाय' न्यूजने दिले आहे.
अंजू लोहारमध्ये पोहचली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र प्रवासी कागदपत्रे पडताळल्यानंतर तिची सुटका करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तिला सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचेही या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, "अंजू एका महिन्याच्या व्हिजावर पाकिस्तान आली आहे. ती नसरुल्लाशी लग्न करणार नाही. ती केवळ त्याला भेटण्यासाठी आली आहे. सध्या ती नसरुल्लाच्या घरी राहते."
हेही वाचा :