bigg boss Marathi
bigg boss Marathi

BBM 4 : कोणते सदस्य होणार सेफ कोणते सदस्य होणार नॉमिनेट ?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद या सदस्यांना निरुपयोगी सदस्य दिले. (BBM 4) काल बिग बॉस यांनी सिझनमधील एक मोठे सरप्राईझ देखील सदस्यांना दिले आणि ते म्हणजे "रूम ऑफ फॉर्च्युन". ज्या खोलीमध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखविले गेले, त्यातून त्यांना एका दरवाज्याची निवड करायची होती. या सांगकाम्या म्हणून झाहीर झालेल्या चारही सदस्यांना आता घरातील सगळी कामे करावी लागणार आहेत. पण, याचसोबत त्यांना एक पॉवर देखील मिळाली आहे. आता हे सदस्य या पॉवरचा कसा उपयोग करणार ? कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे रंजक असणार आहे. कारण घरामध्ये पार पडणार हे सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य "आटली बाटली फुटली" ! (BBM 4)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांनवर नाराजी व्यक्त केली. तिचे म्हणणे आहे,"बर नाहीये हे दिसते आहे तरी माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात." तर त्रिशूलने निखिल राजशिर्के यांना जागवायची गरज आहे म्हणून नॉमिनेशनमध्ये टाकले. आता बघूया पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य होणार सेफ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news