काँग्रेसने वारंवार संविधान बदलले : नितीन गडकरी

काँग्रेसने वारंवार संविधान बदलले : नितीन गडकरी
Published on
Updated on

अक्कलकोट; पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत अक्कलकोटच्या विकासासाठी शेकडो रुपये कर्ज करण्यात आले आहेत. यापुढील काळात सुद्धा विकासाचे आलेख पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (दि.५) केले. देशातील 'गरीबी हटाव'चा नारा काँग्रेसच्या गांधी घराण्यांनी सत्तर वर्षाच्या काळात दिला. मात्र काहीच केले नाही. वारंवार संविधान बदलण्याचे पाप काँग्रेस पक्षाने केले आहे, असे घणाघात टीकाही  नितीन गडकरी यांनी यावेळी केली. ते अक्कलकोट येथे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. सचिन कल्याणशेट्टी, सोमपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, खा. डॉ. जयसिद्धेश्वर म्हास्वामी, आ. सुभाष देशमुख, महेश हिंडोळे, दिलीप सिद्धे, शिवानंद पाटील, संजय देशमुख, सुनील बंडगर, संजय पाटील, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, अविनाश मडीखांबे, शिवराज स्वामी, ज्योती उन्नद, आप्पासाहेब पाटील, रामचंद्र होनराव हे उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, संविधान कोणीच बदलू शकत नाही, मात्र घटना वारंवार बदलण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. जातीवादाचे प्रयोग करून काँग्रेस निवडणूक लढत आहे. काँग्रेसने साठ वर्षात देशाला वंचित ठेवण्याचे पाप केल्याच्या आरोपही मंत्री गडकरी यांनी यावेळी केला. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मागच्या चाळीस वर्षात काँग्रेसने अक्कलकोट तालुक्याचे दुर्दशा केली होती. आता त्यांच्याकडे प्रचारात मुद्दे नसल्याने जातीयवादी बी पेरून निवडणूक लढवत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news