

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. नाइट कर्फ्यु लागू करूनही रुग्णसंख्या वाढू लागल्यास पुढील पावले उचलली जातील, असे चौहान यांनी सांगितले.
रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीसह मध्यप्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अन्य राज्यांमध्ये ज्याप्रमाणे 50 टक्के उपस्थितीसह शाळा सुरू केल्या आहेत त्याप्रमाणे राज्यातही नियम लावण्यात आले आहेत. जर घरात जागा असेल तर कोरोना बाधित रुग्णांना क्वारंटाइन केले जाईल. अन्यथा त्यांना रुग्णालयात भरती केले जाईल, असेही चौहान यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवार सायंकाळी जनतेला उद्देशून संदेश दिला. ते म्हणाले, मध्यप्रदेशात बऱ्याच दिवसांनंतर जवळपास ३० रुग्ण सापडले आहेत. संपूर्ण देशात 7,495 पॉझिटिव्ह केस आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी महाराष्ट्रात 1201, गुजरातमध्ये 91 आणि दिल्लीत 125 नवे रुग्ण आढळले आहेत. आपण सर्वजण जाणतोच की, या राज्यांमध्ये आपले नेहमी येणेजाणे होते. पुर्वानुभव लक्षात घेता महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली त्यानंतर गुजरातमध्येही ती वाढत गेली. त्यानंतर मध्यप्रदेशातील रुग्णसंख्या वाढली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असेच झाले. दुसऱ्या लाटेत आपल्याला प्रचंड हाल सोसावे लागले हे आम्ही विसरु शकत नाही. दोन्ही लाटांची सुरुवात इंदौर आणि भोपाळमधून झाली. इंदौर आणि भोपालमध्ये या आठवड्यात रुग्णसंख्या तीन टक्क्यांनी वाढली आहे.
१६ राज्यांमध्ये आला ओमायक्रॉन
चौहान म्हणाले, कोरोना आपले स्वरुप बदलत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट १६ राज्यांमध्ये फैलावला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात तो येणार नाही हे नाकारू शकत नाही. संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर ओमायक्रॉन वेगाने फैलावत आहे. इंग्लंडमध्ये एक लाख रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत दीड लाख रुग्ण प्रतिदिन आढळत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटते की तिसरी लाट येण्याआधी आपल्याला सतर्क राहिले पाहिजे. हीच योग्य वेळ आहे.
लसीकरण जरुर करा
मुख्यमंत्री चौहान म्हणाले, कोरोना संक्रमण वेगाने फैलावू नये यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहे. केंद्र सरकारने काही सूचना केल्या आहेत. आपण वेळ करून चालणार नाही. मास्क लावून सोशल डिस्टंन्सिंग पाळले पाहिजे. विनाकारण गर्दीत जाणे टाळायला हवे. लशीचा एकही डोस घेतला नसेल तर तत्काळ डोस घेतला पाहिजे. पहिल्या डोसचा अवधी पूर्ण झाला असेल तर दुसरा डोस घेतला पाहिजे.
हेही वाचा :