delhi assembly : दिल्ली विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली, मार्शलला पाचारण

delhi assembly : दिल्ली विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली, मार्शलला पाचारण
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली विधानसभेत (delhi assembly)  गुरूवारी सत्ताधारी आम आदमी पक्षाचे तसेच विरोधी भाजपच्या आमदारांमध्ये शाब्दिक खटके उडाले. शाब्दिक वाद टोकाला पोहचल्याने विधानसभा अध्यक्षांना मार्शलला पाचारण करावे लागले. विधानसभा सत्रादरम्यान सत्ताधाऱ्यांनी आरएसएस विरोधात घोषणाबाजी केली. तर विरोधकांनी टुकडे-टुकडे गँगविरोधात सभागृहात गदारोळ घातल्याने वातावरण तापले होते.

मालवीय नगर (delhi assembly) येथील पार्कमध्ये आरएसएस समर्थक तिरंगा फडकवून देत नाही, असा आरोप सत्तापक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्याकडून करण्यात आला. आरएसएसचा राष्ट्रवाद फसवा आहे. गेल्या ५२ वर्षांपासून आरएसएसने तिरंगा नाही तर त्यांचाच झेंडा फडकवला आहे, असा थेट आरोप भारती यांनी केला. परंतु, त्यांच्या आरोपावर भाजपच्या आमदारांनी आक्षेप नोंदवला. यामुळे दोन्ही बाजूच्या आमदारांनी घोषणाबाजी करीत गदारोळ घातला. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता तसेच जितेंद्र महाजन यांना मार्शल बोलावून सदनाच्या बाहेर काढले. महाजन यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

हे प्रकरण गंभीर असल्याचे मत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले. भाजपचे नेते अथवा नगरसेवक तिरंगा लावण्यापासून रोखत असले तर याहून मोठा देशद्रोह कुठला नाही, असे सिसोदिया म्हणाले. प्राणाची आहुती देवू पंरतु, तिरंगा तिथेच फडकवून. भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सिसोदिया यांनी केली.

राघव चढ्ढा यांचे अभिनंदन (delhi assembly)

दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी पंजाब मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन अर्ज भरणारे आमदार राघव चढ्ढा यांना शुभेच्छा दिल्या. सभागृहात यावेळी चढ्ढा यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सभागृह जरी बदलणार असले तरी जनसेवेचे कार्य अखेरपर्यंत सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विरोधीपक्ष नेते रामवीर सिंह बिधूडी, आमदार प्रल्हाद सिंह साहनी, जनरैल सिंह, राखी बिडलान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news