मंत्री, न्यायाधीश, पत्रकारांचे फोन टॅपिंग; भाजप खासदाराचा आरोप

फाईल फोटो
फाईल फोटो

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  केंद्र सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅपिंग केले जात आहेत, असा आरोप भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. फोन टॅपिंगच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा: 

परखड आणि वादग्रस्त बोलण्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी नेहमी आघाडीवर असतात. त्यांनी याआधीही वादग्रस्त आणि खळबळजनक विधाने केली आहेत.

स्वामी यांनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचे भाष्य करून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी वॉशिंग्टन पोस्ट एक अहवाल जाहीर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अधिक वाचा: 

ते म्हणाले, 'मोदी सरकारमधील मंत्री, आरएसएसचे नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचे काम इस्राईलमधील स्पायवेअर कंपनी पेगाससला देण्यात आले आहे.

त्याचा एक अहवाल रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या माध्यमातून प्रकाशित केला जाणार असल्याची जोरदार अफवा सध्या सोशल मीडियात आहे,' असे ट्विट स्वामी यांनी केले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करताच राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. फोन टॅपिंगच्या माध्यमातून केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकांनाही नामोहरम केले जात आहे.

अधिक वाचा: 

इस्राईल येथील सायबर सुरक्षा कंपनी एनएसओच्या पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर कंपनीवर २०१९ साली देखील फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. त्यावेळी लोकसभा सदस्य पिनाकी मिश्रा यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: राजर्षी शाहू महाराज आणि कोल्हापूरची कुस्ती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news