कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर : पुढील दोन ते तीन महिने धोका कायम

कोरोनाची दुसरी लाट सुरु असतानाही होणारी गर्दी. (संगृहीत फोटो)
कोरोनाची दुसरी लाट सुरु असतानाही होणारी गर्दी. (संगृहीत फोटो)
Published on
Updated on

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. पर्यटनासह धार्मिक यात्रांना होणारी गर्दी धोकादायक ठरु शकते. कोरोनाची तिसरी लाट येण्‍यापूर्वीच नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केले आहे.

अधिक वाचा 

पुढील दोन ते तीन महिने खूप महत्त्‍वपूर्ण आहेत. कोरोनाबाबत  प्रशासन आणि नागरिकांकडून होत असलेल्‍या दुर्लश धोका वाढविणारे असल्‍याचा इशाराही दिला आहे.

file photo
file photo

वैद्‍यकीय क्षेत्रासह राजकीय नेतृत्‍वाने केलेल्‍या विविध उपाययोजनांमुळेच कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे.

याचा अर्थ कोरोना विषाणूचा समूळ नाश झाला असे होत नाही.सर्वच राज्‍यांमध्‍ये सतर्कता आवश्‍यक आहे.

सध्‍या जगभरातील कोरोनाची स्‍थिती आणिमहामारीचा इतिहास पाहता आपल्‍या देशात कोरोनाची तिसरी लाट जवळ आली आहे. तसेच ती अपरिहार्यही आहे.

आपल्‍या देशातील अनेक राज्य सरकारसह नागरिकही 'आत्‍मसंतुष्‍ट' झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करता गर्दी वाढत आहे. ही खूपच चिंताजनक बाब आहे, असे 'आयएमए'ने आपल्‍या प्रसिद्‍धी पत्रकात नमूद केले आहे.

अधिक वाचा 

पर्यटन, धार्मिक यात्रा, धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम हे महत्त्‍वाचे आहेत. मात्र यासाठी आणखी काही महिन्‍यांची प्रतिक्षा आवश्‍यक आहे.सार्वजनिक स्‍थळे सुरु करणे.लस न घेता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करणे हेच तिसरी लाट येण्‍याचे कारण होवू शकते.

पुढील दोन ते तीन महिने कोणतेही संकट निर्माण होईल, असे वर्तन करु नये, असेही स्‍पष्‍ट केले आहे.

मागील २४ तासांमध्‍ये देशात कोरोना रुग्‍ण बरे होण्‍याची टक्‍केवारी ९७.२२ इतकी झाली आहे.

३७ हजार १५४ नवे रुग्‍ण आढळले.देशात सध्‍या ४ लाख ५० हजार ८९९ सक्रीय रुग्‍ण आहेत.३९ हजार ६४९ जण कोरानावर मात केली. तर ७२२ जणांचा मृत्‍यू झाला आहे, अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

सक्रीय रुग्‍णसंख्‍या ही १.४६ टक्‍के इतकी आहे. तर दैनंदिन संसर्ग दर हा २.५९ टक्‍के इतका आहे.

  • व्‍हिडिओ पहा : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news