

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ONLINE सुनावणीवर सरन्यायाधीश संतापले : कोरोना संकटामुळे सर्वोच्च न्यायालयात गेल्या दीड वर्षांपासून आभासी पध्दतीने खटल्यांची सुनावणी सुरु आहे. या सुनावण्यांदरम्यान वारंवार विविध प्रकारचे अडथळे येत असतात.
अशाच प्रकारचा एक अडथळा शुक्रवारी आल्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यांनी चक्क न्यायमूर्तींना प्रताडित केले जात आहे, अशी टिप्पणी यावेळी केली.
ONLINE सुनावणीवर सरन्यायाधीश संतापले
आभासी पध्दतीने सुनावणी करण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जात आहे, त्यात नेहेमी काही ना काही समस्या येत असते. त्यातून न्यायमूर्तींचा त्रागाही दिसून आला होता. पण आजच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश खूपच त्रस्त झाल्याचे दिसून आले.
सुनावणीवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते. यावर सरन्यायाधीशांनी टेक्निकल टीमचे कान उपटले. काय चालत नाही का? कोण काय म्हणत आहे? इतके सारे आवाज कोठून येत आहेत? हे सगळे संभ्रमित करणारे आहे? आदी प्रश्नांची सरबत्ती केली.
वास्तविक टेक्निकल टीमने जुनी यंत्रणा हटवून नवी वेबेक्स यंत्रणा न्यायालयात लावली आहे. टेक्निकल टीमच्या चुकीमुुळे शुक्रवारी सरन्यायाधीशांच्या कोर्टात व्हिडिओ त्यांच्या वकिलांचा चालला होता तर आवाज दुसर्या न्यायालयात युक्तीवाद करीत असलेल्या न्यायमूर्तींचा येत होता. हे सगळे पाहून आम्ही टॉर्चर होत आहोत, अशी टिप्पणी एन. व्ही. रमणा यांनी केली.
हे ही वाचलं का?