Zee vs Nykaa: इन्स्टाग्राम रिल्समध्ये विनापरवाना गाणी वापरणे भोवले! 'झी'ने 'नायका'वर ठोकला २ कोटींचा दावा; काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध मनोरंजन कंपनी 'झी एंटरटेनमेंट'ने सौंदर्यप्रसाधने आणि फॅशन क्षेत्रातील दिग्गज रिटेलर 'नायका' विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Zee vs Nykaa
Zee vs Nykaafile photo
Published on
Updated on

Zee vs Nykaa

नवी दिल्ली: प्रसिद्ध मनोरंजन कंपनी 'झी एंटरटेनमेंट'ने सौंदर्यप्रसाधने आणि फॅशन क्षेत्रातील दिग्गज रिटेलर 'नायका' विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या मालकीच्या गाण्यांचा व्यावसायिक जाहिरातींसाठी विनापरवाना वापर केल्याचा आरोप झीने केला असून, नुकसान भरपाई म्हणून २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील कंटेंन्ट आणि कॉपीराइट कायद्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

झी एंटरटेनमेंटने ३ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. झीचा असा युक्तिवाद आहे की, त्यांचा 'मेटा' प्लॅटफॉर्मशी परवाना करार झाला आहे. या करारानुसार, वैयक्तिक वापरासाठी किंवा बिगर व्यावसायिक पोस्टसाठी सामान्य वापरकर्ते झीची गाणी वापरू शकतात. मात्र, 'नायका'ने आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी आणि लाखो फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी झीच्या कॉपीराइट असलेल्या गाण्यांचा 'इन्स्टाग्राम रिल्स'मध्ये वापर केला.

Zee vs Nykaa
Kiran Mazumdar-Shaw successor | कोणाकडे जाणार 'बायोकॉन'ची धुरा? किरण मजुमदार-शॉ यांचा उत्तराधिकारी ठरला

१२ वादग्रस्त लिंक्स हटवल्या

झीने न्यायालयात ९०० पानांचे कागदपत्र सादर केले असून, त्यामध्ये नायकाद्वारे वापरण्यात आलेल्या १२ इन्स्टाग्राम रिल्सचे स्क्रीनशॉट्स आणि पुरावे दिले आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, नायकाच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, झीने आक्षेप घेतलेल्या त्या १२ लिंक्स आता हटवण्यात आल्या आहेत.

२ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

'नायका'ने कोणतीही पूर्वपरवानगी किंवा अधिकृत परवाना न घेता ही गाणी वापरल्याचा झीचा आरोप आहे. या अवैध वापरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून झीने सुमारे २ कोटी रुपये देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

झी आणि नायका या दोन्ही आपापल्या क्षेत्रातील मोठ्या आणि शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे कॉर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे. कायद्याच्या अभ्यासकांच्या मते, अनेक कंपन्यांचे मार्केटिंग विभाग इन्स्टाग्रामवरील अटी व शर्तींचा सखोल अभ्यास न करता म्युझिक लायब्ररीतील गाणी वापरतात. या खटल्यामुळे अशा प्रकारच्या वापराबाबत कायदेशीर स्पष्टता मिळण्यास मदत होईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे.

Zee vs Nykaa
Donald Trump: "भारताचे नशीबच की मोदींसारखा नेता मिळाला"; बंगालमधील विजयानंतर ट्रम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन; काय म्हणाले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news