Kiran Mazumdar-Shaw successor | कोणाकडे जाणार 'बायोकॉन'ची धुरा? किरण मजुमदार-शॉ यांचा उत्तराधिकारी ठरला

Kiran Mazumdar-Shaw successor | कंपनीतील नेतृत्त्‍वात होणार टप्प्याटप्प्याने बदल
Kiran Mazumdar-Shaw
बायोकॉन (Biocon) कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांनी अखेर आपल्या उत्तराधिकाराबाबतची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. Pudhari
Published on
Updated on

Kiran Mazumdar-Shaw successor

बायोकॉन (Biocon) कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांनी अखेर आपल्या उत्तराधिकाराबाबतची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. त्‍यामुळे कंपनीचे नेतृत्व भविष्यात कोणाकडे असेल, याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून असलेली उत्सुकता आता संपली आहे. 'फॉर्च्युन इंडिया'च्या वृत्तानुसार, मजुमदार-शॉ यांनी त्यांची भाची क्लेअर मजुमदार यांच्‍याकडे कंपनीची धुरा देण्‍याचे निश्चित केले आहे.

क्लेअरने यापूर्वीच आपली सिद्ध केली आहे : किरण मजुमदार-शॉ

मजुमदार-शॉ यांच्या मते, बायोकॉनला पुढील टप्प्यावर नेण्यासाठी क्लेअर ही योग्य व्यक्ती आहे. स्वतःला अपत्य नसल्यामुळे, त्यांनी आपला विश्वास असलेल्या व्यक्तीकडे कंपनीची धुरा सोपवण्यावर भर दिला आहे. क्लेअरने यापूर्वीच आपली नेतृत्वक्षमता आणि व्यवसाय चालवण्याचे कौशल्य सिद्ध केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Kiran Mazumdar-Shaw
corporate ceo departures 2026: CEO सोडून जाण्याचे प्रमाण वाढलं... ओपन AI पासून अॅपलपर्यंत, लिस्ट आहे मोठी; यात भारतीय किती?

नेतृत्त्‍व बदल हा टप्प्याटप्प्याने होईल

हे नेतृत्व बदल एका रात्रीत होणार नाहीत. किरण मजुमदार-शॉ यांनी स्पष्ट केले की, त्या लवकरच पायउतार होणार नाहीत. त्याऐवजी, हा बदल टप्प्याटप्प्याने होईल, ज्यामुळे क्लेअरला हळूहळू अधिक जबाबदाऱ्या स्वीकारता येतील आणि कंपनीत स्थिरता कायम राहील.

Kiran Mazumdar-Shaw
Who is John Ternus: ॲपल कंपनीचे नवे CEO जॉन टर्नस कोण आहेत? किती आहे संपत्ती? जाणून घ्या त्यांचा प्रवास

कोण आहेत क्लेअर मजुमदार?

क्लेअर मजुमदार सध्या 'बिकारा थेरप्युटिक्स' कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. ही कंपनी बायोकॉनच्या मार्गदर्शनाखालीच आकारास आली आहे. क्लेअर यांनी MIT आणि स्टॅनफोर्ड सारख्या नामवंत संस्थांमधून पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी कॅन्सर बायोलॉजीमध्ये पीएचडी (PhD) देखील केली आहे. त्यांना जागतिक बायोटेक कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. 'बिकारा' ही कंपनी २०२४ मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली असून, तिने बाजारात आपले स्थान मजबूत केले आहे.मजुमदार-शॉ यांनी व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांबद्दलही माहिती दिली. क्लेअर यांचा भाऊ एरिक मजुमदार हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मधील तज्ज्ञ आहे, तर तिचे पती थॉमस रॉबर्ट्स हे प्रख्यात ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोग तज्ज्ञ) आहेत.

Kiran Mazumdar-Shaw
Smartphone Apps: स्मार्टफोनमधून अॅप्स गायब होणार; Nothingच्या CEOचा मोठा दावा, काय काय बदलणार?

बायोकॉनची बदलती व्यावसायिक रणनीती

नेतृत्व बदलांसोबतच, बायोकॉन आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करत आहे. कंपनीचे मुख्य लक्ष आता 'बायोसिमिलर्स' वर आहे, ज्यातून कंपनीला मोठा महसूल मिळतो. सध्या अनेक नवी उत्पादने निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. श्रीहास तांबे आता 'बायोकॉन बायोलॉजिक्स'चे नेतृत्व करत आहेत, तर सिद्धार्थ मित्तल जुलैपासून 'सिनजीन इंटरनॅशनल'ची जबाबदारी स्वीकारणार आहेत. भविष्याचा वेध घेताना मजुमदार-शॉ म्हणाल्या की, बायोकॉन प्रगत बायोटेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवेल. नवीन औषधे विकसित करणे आणि संशोधन क्षमता मजबूत करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असून त्याद्वारे दीर्घकालीन वृद्धी साधली जाईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news