Ahmedabad Plane Crash | अवघ्या दोन दिवसांत नियतीने हिरावून घेतलं तिचं सौभाग्य

Plane Crash | वडोदरा शहरातील महेश्वरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Ahmedabad Plane Crash
अवघ्या दोन दिवसांत नियतीने हिरावून घेतलं तिचं सौभाग्य
Published on
Updated on

Ahmedabad Plane Crash | 

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे देश हादरून गेला आहे. या दुर्घटनेत अनेकांची कुटुंब होत्याची नव्हती झाली. काहीचं अख्खं कुटुंब दुर्घटनेत संपून गेलं. या विमान दुर्घटनेनं दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नववधूचं सौभाग्य हिरावून घेतल्याचीही घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी लग्नसराईचं वातावरण असलेल्या वडोदरा शहरातील महेश्वरी कुटुंबात तरूण मुलगा गमवल्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वडोदरा शहरातील वाडी परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरी याचा १० जून रोजी विवाह झाला होता. त्याने कोर्ट मॅरेज केले. मात्र दोन दिवसांनी तो परत लंडनला परतला तो परत न येण्यासाठीच.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash | एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांची वाढीव सुरक्षा तपासणी करण्याचे डीजीसीएचे आदेश

भाविक माहेश्वरी हा तरूण अनेक वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होता. दरवर्षी तो १५ दिवसांसाठी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वडोदरा येथे येत होता. त्याचा आधी साखरपूडा झाला असून तो यावेळी गावी आला असता कुटुंबातील सदस्यांनी त्याला लग्न करून जा, असा आग्रह केला. कुटुंबातील सदस्यांच्या आग्रहाखातीर त्याने १० मार्च रोजी कोर्ट मँरेज केले. लग्नानंतर दोन दिवसांनी परत लंडनला निघताना नववधूने त्याला निरोप दिला तो शेवटचाच. अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही तासांतच विमान दुर्घटनेची वार्ता कानावर आली व तिचे सौभाग्य विमानं दुर्घटनेत नियंतीनं घेतलं.

विमान दुर्घटनेने घेतला २७० जणांचा जीव

अहमदाबाद विमानतळावरून दुपारी लंडनला निघालेले एअर इंडियाचे एआय 171 हे बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे विमान काही वेळातचं मेघानी नगर परिसरातील सिव्हिल हॉस्पीटलच्या होस्टेलवर कोसळले. या दुर्घटनेत २७० जणांनी आपला जीव गमावला. दैव बलवत्तर म्हणून एक तरूण यातून कसाबसा वाचला.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash : अन् अपर्णा महाडिक यांची अंबाबाई दर्शनाची आस अधुरीच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news