West Bengal Election Results : बंगालमधील 22 जागांवर मुख्यमंत्री योगींचा ‘विजयी’ झंझावात! 90 टक्के जागांवर ‘कमळ’ फुलले

भाजपच्या महाविजयात योगी आदित्यनाथ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Yogi Adityanath West Bengal Election Results
Published on
Updated on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारदौऱ्याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ज्या २२ मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या, त्यांपैकी १९ जागांवर भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. भाजपचा हा 'स्ट्राइक रेट' तब्बल ९० टक्क्यांच्या घरात आहे. एकूणच, भाजपने २०७ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमतासह सत्ता काबीज केली आहे.

सत्तापरिवर्तनाचा ऐतिहासिक विजय

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. २०७ जागांवर विजय मिळवत भाजपने दोन तृतीयांश बहुमताचा टप्पा पार केला असून, तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेला सुरुंग लावला आहे. २९४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता असते. मात्र, 'फलता' येथील मतदान रद्द झाल्याने २९३ जागांची मतमोजणी झाली, ज्यामुळे बहुमताचा आकडा १४७ वर स्थिरावला. भाजपच्या या महाविजयात योगी आदित्यनाथ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Yogi Adityanath West Bengal Election Results
Kerala Election Results : शशी थरुर होणार केरळचे मुख्यमंत्री? काँग्रेस खेळणार मोठा डाव

योगींच्या प्रचाराचा प्रभाव: २२ पैकी १९ जागांवर विजय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये एकूण २२ जागांवर निवडणूक प्रचार केला होता. त्यापैकी १९ उमेदवारांनी विजय मिळाला, जो योगींच्या जनसंवाद कौशल्याचे आणि लोकप्रियतेचे प्रतीक मानले जात आहे.

भाजपच्या विजयाचे प्रमुख शिलेदार

  • निसिथ प्रामाणिक (माथाभांगा) : ५७,०९० मताधिक्य

  • नीलाद्री शेखर दाना (बांकुडा) : ५४,१७७ मताधिक्य

  • अरूप कुमार दास (कांथी दक्षिण) : ३१,४७२ मताधिक्य

  • खानरा निर्मल (नंदकुमार) : ३०,६०३ मताधिक्य

  • भाजपने विजय मिळवलेले मतदारसंघ आणि मताधिक्य

  • सोनामुखी : दिबाकर घरामी : २९,४१०

  • नंदकुमार : खानरा निर्मल : ३०,६०३

  • कांथी दक्षिण : अरूप कुमार दास : ३१,४७२

  • बाराबनी : अरजित रॉय : ११,७२२

  • रामपुरहाट : धुर्वा साहा : २४,२३३

  • माथाभांगा : निसिथ प्रामाणिक : ५७,०९०

  • धुपगुड़ी : नरेश रॉय : ३८,५५०

  • बांकुडा (रोड शो) : नीलाद्री शेखर दाना : ५४,१७७

  • पिंगला : स्वागत मन्ना : १८,४८०

  • जॉयपुर : बिस्वजीत महतो : २२,२१८

  • जोरासांको : विजय ओझा : ५,७९७

  • चकदहा : बंकिम चंद्र घोष : ३६,९४५

  • नबद्वीप : श्रुति शेखर गोस्वामी : २१,४४४

  • कटवा : कृष्णा घोष : ३५,०६६

  • बागदा : सोमा ठाकुर : ३४,६१६

  • कल्याणी (रोड शो) : अनुपम बिश्वास : ३४,७९२

  • दमदम (रोड शो) : अरजित बख्शी : २५,२७३

  • राजारहाट : गोपालपुर : तरुण ज्योति तिवारी : २७,७५७

  • गारबेटा : प्रदीप लोढ़ा : २६,२२५

Yogi Adityanath West Bengal Election Results
‘त्यांनी मला लाथ मारली आणि CCTV बंद केले’, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप

या ३ जागांवर तृणमूलने राखला बालेकिल्ला

योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केलेल्या क्षेत्रांपैकी केवळ तीन जागांवर तृणमूल काँग्रेसला विजय मिळवता आला. धानेखालीतून असीमा पात्रा (१३,०५७ मते), बोलपूरमधून चंद्रकांत सिन्हा (१३,१८८ मते) आणि उदयनारायणपूरमधून समीर कुमार पांजा (१२,२२७ मते) यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला.

एकूणच, योगी आदित्यनाथ यांचा प्रचार भाजपसाठी 'गेमचेंजर' ठरला असून त्यांचा ९० टक्के स्ट्राइक रेट चर्चेचा विषय ठरला आहे. या विजयामुळे पश्चिम बंगालच्या इतिहासात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री राज्याची धुरा सांभाळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news