xi jinping india visit : सात वर्षांत पहिल्यांदाच चिनी अध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येणार

‘ब्रिक्स’ (BRICS) शिखर परिषदेत ४०० जणांचे मोठे शिष्टमंडळ असण्याची शक्यता
xi jinping india visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग
Published on
Updated on

xi jinping india visit : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तब्बल सात वर्षांनंतर प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘ब्रिक्स’ (BRICS) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जिनपिंग एका मोठ्या शिष्टमंडळासह भारतात दाखल होणार असल्याची माहिती रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

१२ आणि १३ सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स परिषदेचे आयोजन

भारतात १२ आणि १३ सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सीमावादानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने या दौऱ्याकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.२०२० मधील लडाख सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, या परिषदेदरम्यान भारत आणि चीनमधील संबंध पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांना कितपत यश येते, याकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे. "चिनी अधिकाऱ्यांची पथके सध्या सुरक्षेची पाहणी आणि हॉटेल आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त आहेत," अशी माहिती एका उच्चपदस्थ भारतीय सूत्राने दिली.

xi jinping india visit
Harbhajan Singh : हरभजन सिंगचा पॉलिटिकली 'दुसरा' ठरला अचूक; ड्रग्स प्रकरणातील 'तो' व्हिडिओ पंजाबमधीलच!

४०० हून अधिक अधिकाऱ्यांचा ताफा

भारतीय सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी जिनपिंग यांच्यासोबत जवळपास ४०० अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भारतात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१९ मधील भारत दौऱ्यात त्यांच्यासोबत २०० पेक्षा कमी अधिकारी आले होते.सूत्रांच्या मते, दोन्ही देशांचे मुत्सद्दी या परिषदेचा वापर परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि सीमावादासह प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दौऱ्याचे अंतिम नियोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व जिनपिंग यांच्यातील संभाव्य द्विपक्षीय बैठकीचा अजेंडा अद्याप निश्चित होणे बाकी आहे.

xi jinping india visit
Jaishankar Russia visit : जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये घेतली रशियन अध्यक्ष पुतिन यांची भेट, BRICS पूर्वी मोठी घडामोड!

ब्रिक्स सहकार्याला आम्‍ही मोठे महत्त्व देतो : चीनच्या परराष्ट्र मंत्रालय

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "चीन ब्रिक्स सहकार्याला मोठे महत्त्व देतो आणि त्यात सक्रिय सहभाग घेतो. यंदाच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्रिक्स परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चीन भारताला पूर्ण पाठिंबा देतो." मात्र, जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत चीन किंवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे भाष्य करणे टाळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news