Harbhajan Singh : हरभजन सिंगचा पॉलिटिकली 'दुसरा' ठरला अचूक; ड्रग्स प्रकरणातील 'तो' व्हिडिओ पंजाबमधीलच!

लुधियाना पोलिसांची माहिती; विरोधकांसह ट्रोल्‍स करणार्‍यांना सुनावले

Harbhajan Singh Punjab drug political controversy
जग्राव पुलाखाली ड्रग्ज घेताना दिसणाऱ्या तरुणाला लुधियाना पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजीच अटक केली आहे.
Published on
Updated on

Harbhajan Singh Punjab drug political controversy

माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार हरभजन सिंग यांनी पंजाबमधील ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजकीय पटलावर जोरदार 'दुसरा' (ऑफस्‍पिनमधील हुकमी फिरकी चेंडू) फेकला आहे. त्यांनी शेअर केलेला आणि एका तरुणाला उघडपणे ड्रग्ज घेताना दाखवणारा वादग्रस्त व्हिडिओ पंजाबमधील जग्राव येथीलच असल्याचे राज्य पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

भाजप नेते बिट्टूंचा व्हिडिओ केला रिट्विट

भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट केलेला व्हिडिओ रिट्विट करत हरभजन सिंग यांनी विरोधक आणि ट्रोल्सवर निशाणा साधला होता. "आता पेड ट्रोल्स जग्राव पूल हा राजस्थानमध्ये आहे असे घोषित करतील," असा टोला त्यांनी लगावला होता.

राजस्थान व्हिडिओच्या वादानंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

यापूर्वी हरभजन सिंग यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे तथ्य तपासणीतसमोर आले होते. त्यावेळी तो व्हिडिओ पंजाबमधील असल्याचा दावा करण्यात आल्याने मोठा विवाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे ताजे स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जुना असू शकतो; मात्र जग्राव पुलाखाली ड्रग्ज घेताना दिसणाऱ्या त्या तरुणाला लुधियाना पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजीच अटक केली आहे.


Harbhajan Singh Punjab drug political controversy
ISRO Rocket Launch Cost |जगातील सर्वात महागडी रॉकेट लाँचिंग भारताची: 'कॅम्ब्रिज'चा दावा; इस्रोने दिले सडेतोड उत्तर

ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले

पंजाबमधील ड्रग्ज समस्येवरून सध्या सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप) आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. विरोधक सोशल मीडियावरील अशा व्हिडिओंना हत्यार बनवून भगवंत मान सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे 'आप' सरकार ड्रग्ज नेटवर्क आणि माफियांविरोधात कडक कारवाई करत असल्याचा दावा करत आहे.


Harbhajan Singh Punjab drug political controversy
Bangladesh Tragedy : बांगलादेशात पुन्हा हिंदू टार्गेटवर? निवृत्त शिक्षक, पत्नी अन् दोन मुलांचे आढळले मृतदेह

ड्रग्‍ज नेटवर्कचा समूळ नाश करण्‍याचे सरकारसमोर आव्‍हान

पंजाबची भौगोलिक रचना पाकिस्तान सीमेला लागून असल्याने ड्रग्ज तस्करांचे जाळे मोठे आहे. तस्कर आता ड्रोन, जीपीएस पेलोड आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर करत आहेत. राज्य सरकार याविरोधात पुनर्वसन आणि अटकेची सत्रे राबवत असले, तरी मोठ्या ड्रग्ज नेटवर्क मूळापासून उखडणे हे अजूनही मोठे आव्हान ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news