World 5 Biggest Dam Bursts: चीनमध्ये फुटली होती तब्बल ६२ धरणे... निसर्गानं थैमान घातलेल्या जगातील ५ मोठ्या घटना

World 5 Biggest Dam Bursts
World 5 Biggest Dam Burstspudhari
Published on
Updated on

World 5 Biggest Dam Bursts: नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवरील शक्तीशाली भूकंपानंतर भूस्खलन झाले. त्यानंतर नेपाळमधील रुसवा जिल्ह्यात मोठा पूर आला. भोटे कोसी नदीला आलेल्या या भयानक पुरात अनेक लोकं वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता मृत्यांचा आकडा हा शेकडोमध्ये असला तरी तो आकडा वाढू शकतो अशी शंका जाणकार व्यक्त करत आहेत. चीन आणि नेपाळच्या बॉर्डरवरील या नैसर्गिक थैमानाचे आता नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत.

World 5 Biggest Dam Bursts
China On Nepal Flash Flood: चीननं असं का केलं? नेपाळच्या पत्रकारांचा आरोप, राजदुतांनी दिलं वेगळंच स्पष्टीकरण

यानंतर जगभरातील अशा मोठ्या दुर्घटनांबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशाच जगभरात ५ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ज्यात नद्यांना अचानक पूर आला आहे किंवा धरणे फुटण्याची घटना घडली आहे. चीनमध्ये १९७५ मध्ये बानिकियाओ धरण दुर्घटना घडली होती. त्यात जवळपास ६२ छोटी धरणे एकापाठोपाठ एक फुटली होती.

World 5 Biggest Dam Bursts
Nepal-Tibet Floods : नेपाळ घटनेत जिल्ह्यातील कोणीही अडकलेले नाही

१. बानकियाओ धरण दुर्घटना, चीन (१९७५)

१९७५ मध्ये चीनमध्ये आलेल्या 'नीना' चक्रीवादळामुळे सलग मुसळधार पाऊस झाला. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड दाबाने बानकियाओ धरण आणि त्याखालची सुमारे ६२ छोटी धरणे एकापाठोपाठ एक फुटली. यातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या लाटेने संपूर्ण शहरे आणि गावे उद्ध्वस्त केली. या महाभयंकर आपत्तीत सुमारे १ लाख ७१ हजार ते २ लाख लोकांचा मृत्यू झाला. जगातील ही सर्वात मोठी धरण दुर्घटना मानली जाते.

World 5 Biggest Dam Bursts
Nepal flash flood cause: भूकंप की हिमनदी कोसळली? नेपाळमधील महाप्रलयाचे नक्की कारण काय? अमेरिकन संस्थेचा मोठा खुलासा

२. केदारनाथ जलप्रलय, उत्तराखंड - भारत (२०१३)

जून २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी आणि त्यानंतर चोराबरी हिमनदीचा (ग्लेशियर) तलाव फुटल्याने डोंगरावरून पाण्याचा आणि चिखलाचा प्रचंड लोंढा खाली आला. या फ्लॅश फ्लडने मंदाकिनी नदीच्या खोऱ्यात हाहाकार उडवला. केदारनाथ मंदिर परिसर, रस्ते आणि आजूबाजूची गावे पूर्णपणे वाहून गेली. या नैसर्गिक आपत्तीत ६,००० हून अधिक लोकांचा बळी गेला.

३. डर्ना धरण दुर्घटना, लिबिया (२०२३)

सप्टेंबर २०२३ मध्ये 'डॅनियल' चक्रीवादळामुळे लिबियामध्ये विक्रमी पाऊस झाला. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड दाबाने डर्ना शहराजवळील दोन धरणे फुटली. डोंगरावरून खाली आलेल्या या पुराच्या पाण्याने थेट शहरात प्रवेश केला आणि डर्ना शहराचा एक चतुर्थांश भाग थेट समुद्रात वाहून नेला. या भीषण दुर्घटनेत ११,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेपत्ता झाले.

World 5 Biggest Dam Bursts
Nepal Floods Maharashtra Helpline : नेपाळ महापुरात अडकलेल्या महाराष्‍ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी 'हेल्पलाईन' सुरु

४. वजोंट धरण आपत्ती, इटली (१९६३)

१९६३ मध्ये इटलीतील वजोंट धरणाच्या जलाशयात डोंगराचा एक महाकाय कडा (Landslide) अचानक कोसळला. डोंगर पाण्यात पडल्यामुळे धरणात ८२० फूट उंच पाण्याची महाकाय लाट (Megatsunami) निर्माण झाली. हे पाणी धरणाच्या भिंतीवरून ओसंडून खाली असलेल्या लोंगारोन आणि इतर गावांवर कोसळले. अवघ्या काही मिनिटांत सर्व गावे नष्ट झाली आणि सुमारे २,००० लोकांचा जागीच मृत्यू झाला.

World 5 Biggest Dam Bursts
Nepal-Tibet Floods : तिबेटमध्ये पुण्याचे चार यात्रेकरू संकटात; दोन महिलांची प्रकृती चिंताजनक, हवाई मदतीची याचना

५. जॉनस्टाऊन पूर, अमेरिका (१८८९)

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक घटनांपैकी एक. सलग मुसळधार पावसामुळे पेनसिल्व्हेनियामधील 'साऊथ फोर्क धरण' फुटले. या धरणातून सुमारे दोन कोटी टन पाणी एका अरुंद दरीतून ताशी ६४ किलोमीटर वेगाने डोंगरावरून खाली असलेल्या जॉनस्टाऊन शहरात घुसले. या पाण्याच्या भिंतीने वाटेत आलेले सर्व काही उद्ध्वस्त केले आणि यात २,२०९ लोकांनी प्राण गमावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news