Nepal Floods Maharashtra Helpline : नेपाळ महापुरात अडकलेल्या महाराष्‍ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी 'हेल्पलाईन' सुरु

राज्‍य सरकारचे तातडीचे पाऊल; नातेवाईकांना माहिती नोंदवण्याचे आवाहन
Nepal Floods Maharashtra Helpline
Nepal Floods Maharashtra HelplineFile Photo
Published on
Updated on

Nepal Floods Maharashtra Helpline

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत विविध देशांतील पर्यटकांसह महाराष्ट्रातील अनेक नागरिक व पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरनाने (मंत्रालय, मुंबई) युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत

मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत करण्यात आला असून, मदत व संपर्कासाठी विशेष टोल-फ्री क्रमांक, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी करण्यात आले आहेत.

  • २४ तास कार्यरत हेल्पलाईन व संपर्क पर्याय

  • राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)

  • थेट संपर्क नियंत्रण कक्ष +91-9321587143

  • अधिकृत ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in

  • माहिती नोंदवण्यासाठी अधिकृत लिंक: https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

Nepal Floods Maharashtra Helpline
Nepal Flood : नेपाळमधील महापुरात १०० हून अधिक भारतीय बेपत्ता; उत्तर प्रदेश, बिहारमध्ये का देण्‍यात आला सतर्कतेचा इशारा?

नातेवाईकांना प्रशासनाचे आवाहन

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक अडकले असल्यास, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अथवा नातेवाईकांनी घाबरून न जाता तातडीने वरील लिंकवर जाऊन पर्यटकांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहिती नोंदवताना संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता, प्रवासाचा सविस्तर तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे सोपे होईल. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Nepal Floods Maharashtra Helpline
China On Nepal Flash Flood: चीननं असं का केलं? नेपाळच्या पत्रकारांचा आरोप, राजदुतांनी दिलं वेगळंच स्पष्टीकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news