Nepal-Tibet Floods : नेपाळ घटनेत जिल्ह्यातील कोणीही अडकलेले नाही

जिल्हा प्रशासनाकडून लिंक जारी; अधिक माहिती देण्याचे आवाहन
Nepal flash floods
Nepal flash floodsFile Photo
Published on
Updated on

No one from the district is stranded in the Nepal incident

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला बुधवारी (दि. २६) अचानक आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणीही अडकले नसले तरी या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तत्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे हेल्प लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Nepal flash floods
चांदगुडे कुटुंब मृत्यूप्रकरण : 'ते' जीवन संपविणे नव्हे, तर दुरावलेल्या बापाला घरी आणण्यासाठी गेलेल्या लेकाचा दुर्दैवी अपघात

https:///geospatial.mahaseo c.inahayata_gulf / या लिंकवर अधिक माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष विनय गौडा जी. सी. यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Nepal flash floods
Sugar Price Hike : शहरात नाही साखरेचा तुटवडा, मात्र दरवाढीमुळे मागणी घटली

अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर 0240-2331077, 7350335104 येथे संपर्क साधता येऊ शकेल. दरम्यान, तेथे संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक अडकल्याची कोणतीही माहिती अद्याप प्रशासनाकडे प्राप्त झालेली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news