Nepal flash flood cause: भूकंप की हिमनदी कोसळली? नेपाळमधील महाप्रलयाचे नक्की कारण काय? अमेरिकन संस्थेचा मोठा खुलासा

तिबेटमधील शक्तिशाली भूकंपानंतर युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) या अमेरिकन संस्थेने बुधवारी उशिरा या महाप्रलयामागील नेमके कारण स्पष्ट केले आहे.
Nepal flash flood
Nepal flash floodFile Photo
Published on
Updated on

Nepal flash flood cause

काठमांडू : महापुराने केलेल्या विध्वंसामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडाला आहे. बुधवारी सकाळी भोटे कोसी नदीला आलेल्या महापुराने जणू प्रलयाचे रूप धारण केल्याने १६० हून अधिक जणांचा बळी घेतला, तर कित्येक जण जखमी झाले. या महापुरात शेकडो पर्यटक वाहून गेले असून त्यात १३३ भारतीयांसह ८४४ जणांचा समावेश आहे. या विनाशकारी आपत्तीनंतर युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) या अमेरिकन संस्थेने बुधवारी उशिरा या महाप्रलयामागील नेमके कारण स्पष्ट केले आहे.

नेपाळमध्ये बुधवारी सकाळी आलेला अचानक पूर भूकंपामुळे नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने आला होता, असे यूएसजीएसने स्पष्ट केले. सुरुवातीला ज्याला भूकंपाचे हादरे मानले गेले होते, ती प्रत्यक्षात हिमनदी कोसळल्याची आणि ढिगाऱ्याच्या तीव्र प्रवाहाची घटना होती. यामुळेच नदीच्या प्रवाहाच्या दिशेने असलेल्या सखल भागात प्रचंड विध्वंस झाला.

Nepal flash flood
Nepal flash floods: नेपाळमध्ये महाप्रलयाचे तांडव: १६० जणांचा मृत्यू; १३३ भारतीयांसह ८४४ जण बेपत्ता

सुरुवातीला भूकंपाचा संशय

यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या वेळेनुसार सकाळी ८:३७ वाजता काठमांडूच्या उत्तरेकडील नेपाळ-चीन सीमेवर ४.४ तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली होती. मात्र, नंतर संस्थेने यात सुधारणा करत स्पष्ट केले की, तो भूकंप नसून हिमनदी कोसळून झालेल्या भूस्खलनाचा हादरा होता. तिथे कोणताही भूकंप झाला नव्हता.

'प्लॅनेट लॅब्स'च्या उपग्रह प्रतिमांच्या प्राथमिक अभ्यासातून असे दिसून आले की, नेपाळ-चीनच्या रसुवागढी बॉर्डर क्रॉसिंगपासून सुमारे २० किलोमीटर ईशान्येला असलेल्या लेंडे नदीत बर्फ आणि खडकांचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने हा जलप्रलय आला.

लेंडे ही चीनमधून नेपाळच्या दिशेने वाहणाऱ्या भोटे कोशी नदीची उपनदी आहे. या दुर्घटनेत १६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे भूस्खलन इतके भीषण होते की, त्यामुळे निर्माण झालेल्या भूगर्भातील कंपनांची तीव्रतेची नोंद ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपासारखी झाली होती.

Nepal flash flood
Nepal-Tibet Floods : तिबेटमध्ये पुण्याचे चार यात्रेकरू संकटात; दोन महिलांची प्रकृती चिंताजनक, हवाई मदतीची याचना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news