Panipuri viral news
उत्तर प्रदेश : पाणीपुरी खाताना जबडा निखळल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या ओरिया मधील आहे. पाणीपुरी खाण्याच्या अति उत्साहात महिलेने प्रमाणाच्या बाहेर जबडा उघडल्याने ही घटना घडली.
ओरिया येथील इंकला देवी (वय ५०) नावाच्या महिलेसोबत हा अजब प्रकार घडला. इंकला देवी यांनी पाणीपुरी खाण्यासाठी जेव्हा तोंड उघडले, तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त उघडले गेले. यामुळे त्यांच्या जबड्याची बाजूची अलाईमेंट निखळली. अलाईमेंट बिघडल्यामुळे त्यांचे तोंड बंदच होईना.
इंकला देवी यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर स्पष्ट केले की, 'जबडा प्रमाणापेक्षा खूप जास्त उघडल्यामुळे तो निखळला आहे आणि त्यामुळे तो बंद होत नाहीये.' सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.