

Why Is K2 More Dangerous Than Everest: जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांच्या पाकिस्तानातील काराकोरम पर्वतरांगेतील ब्रॉड पीक येथे झालेल्या हिमस्खलनात मृत्यू झाल्याने संपूर्ण गिर्यारोहण विश्व हादरले आहे. जगातील 8,000 मीटरपेक्षा उंच असलेल्या सर्व 14 शिखरांवर विक्रमी वेळेत चढाई करणाऱ्या या धाडसी गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्यानंतर K2 पर्वत पुन्हा चर्चेत आला आहे. एव्हरेस्टनंतर जगातील दुसरे सर्वात उंच शिखर असलेला K2 हा एव्हरेस्टपेक्षाही अधिक कठीण आणि जीवघेणा का मानला जातो, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
निर्मल पुर्जा हे ब्रिटिश आर्मीच्या गोरखा रायफल्स आणि यूके स्पेशल बोट सर्व्हिसमधील माजी सैनिक होते. 2019 मध्ये त्यांनी अवघ्या 6 महिने आणि 6 दिवसांत जगातील 8,000 मीटरपेक्षा उंच असलेल्या सर्व 14 शिखरांवर यशस्वी चढाई करून जागतिक विक्रम केला होता.
2021 मध्ये त्यांनी नऊ नेपाळी गिर्यारोहकांसह हिवाळ्यात K2 सर करणारे पहिले पथक म्हणून इतिहास रचला होता. मात्र, अनुभवी गिर्यारोहक असतानाही निसर्गाच्या रौद्र रूपापुढे त्यांनाही हार मानावी लागली.
1. उभा आणि मोठा पर्वत
K2 ची उंची 8,611 मीटर आहे. हा पर्वत एव्हरेस्टपेक्षा अधिक उभा आणि खडा असल्याने चढाई करताना विश्रांती घेण्यासाठी किंवा सुरक्षित तंबू उभारण्यासाठी फारच कमी जागा उपलब्ध असते.
2. 'बॉटलनेक' – सर्वात जीवघेणा टप्पा
K2 वरील सर्वात धोकादायक भाग म्हणजे 'बॉटलनेक', जो सुमारे 8,200 मीटर उंचीवर आहे. या अरुंद मार्गावरून जाताना गिर्यारोहकांना हिमखंडांच्या खालीून जावे लागते. हे हिमखंड कोणत्याही क्षणी कोसळू शकतात.
3. 'डेथ झोन'चा धोका
8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीला 'डेथ झोन' म्हटले जाते. येथे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्यपेक्षा केवळ एक-तृतीयांश असते. त्यामुळे श्वास घेणे कठीण होते, शरीर पटकन थकते, निर्णयक्षमता कमी होते आणि जीवाला धोका वाढतो.
गिर्यारोहकांच्या मते, उन्हाळ्यात K2 सर करणेच मोठे आव्हान असते, पण हिवाळ्यात हा पर्वत अक्षरशः मृत्यूचा सापळा बनतो.
तापमान उणे 50 अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते.
ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतात.
जेट स्ट्रीममुळे अचानक बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
आज अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरणे, हवामानाचा अचूक अंदाज आणि आधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध असली तरी K2 अजूनही जगातील सर्वात कठीण गिर्यारोहण मोहिमांपैकी एक मानला जातो. कारण येथे हवामान काही क्षणांत बदलते.
निर्मल पुर्जा यांच्यासारखा अनुभवी आणि विक्रमवीर गिर्यारोहकही हिमस्खलनापासून स्वतःला वाचवू शकला नाही. या दुर्घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, K2 हा केवळ उंच पर्वत नाही, तर निसर्गाच्या सर्वात कठीण आणि अनिश्चित आव्हानांपैकी एक आहे. अनुभवी गिर्यारोहकांसाठीही हा पर्वत जीवघेणा ठरू शकतो.