Nirmal Purja death : जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा पुर्जा यांचे 'पीओके'मध्ये हिमस्खलनात निधन

गिर्यारोहण क्षेत्रावर शोककळा, हिमस्खलनानंतर निर्मल पुर्जांसह इतर गिर्यारोहक झाले होते बेपत्ता
Famous mountaineer Nirmal Purja death
जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा File Photo
Published on
Updated on

Famous mountaineer Nirmal Purja death : पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील काराकोरम पर्वतरांगेत असलेल्या ८,०४७ मीटर उंच 'ब्रॉड पीक' शिखरावर आलेल्या भीषण हिमस्खलनात जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या 'एलीट एक्सपेड' या पर्वतारोहण कंपनीने शनिवारी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या दुःखद घटनेची माहिती दिली आहे.

ब्रॉड पीकवर भीषण हिमस्खलन

गुरुवारी पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील काराकोरम पर्वतरांगेत असलेल्या ८,०४७ मीटर उंच 'ब्रॉड पीक' शिखरावर हिमस्खलन झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये निर्मल पुर्जा आणि त्यांच्यासोबतचे इतर गिर्यारोहक बेपत्ता झाले होते. अनेक तास राबवलेल्या शोध आणि बचाव मोहिमेनंतर पुर्जा यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेमुळे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रावर प्रचंड शोककळा पसरली आहे.

Famous mountaineer Nirmal Purja death
Jannu East First Ascent | फ्रेंच गिर्यारोहकाचा ऐतिहासिक पराक्रम; जन्नू ईस्ट शिखरावर प्रथमच मानवी पाऊल

पुर्जांचे सहकारी आणि गाईड बहादूर गुरुंग तसेच नीमा शेर्पा यांचाही मृत्यू

'एलीट एक्सपेड'ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने आम्ही जाहीर करत आहोत की, ब्रॉड पीकवरील हिमस्खलनात निर्मल पुर्जा यांचे निधन झाले आहे." या मोहिमेत पुर्जा यांचे विश्वासू सहकारी आणि गाईड बहादूर गुरुंग तसेच नीमा शेर्पा यांचाही मृत्यू झाला आहे. कंपनीने सर्व मृतकांच्या कुटुंबियांप्रती आणि मित्रांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

जगातील सर्वोत्तम गिर्यारोहकांपैकी एक, जागतिक विक्रमही नावावर

निर्मल पुर्जा यांची गणना जगातील सर्वोत्तम आणि धाडसी गिर्यारोहकांमध्ये केली जात असे. नेपाळमध्ये जन्मलेल्या पुर्जा यांनी ब्रिटनच्या 'स्पेशल बोट सर्व्हिस'मध्येही सेवा बजावली होती. २०१९ मध्ये त्यांनी अवघ्या ६ महिने आणि ६ दिवसांत जगातील सर्व १४ (८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची) शिखरे सर करून जागतिक विक्रम रचला होता. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित '14 Peaks: Nothing Is Impossible' ही नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध डॉक्युमेंट्री प्रचंड गाजली, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली.

Famous mountaineer Nirmal Purja death
Deepest Cave in World | जॉर्जियात आहे जगातील सर्वात खोल गुहा..!

स्‍वप्‍न राहिले अधुरे

अतिरिक्त ऑक्सिजनशिवाय जगातील सर्व १४ आठ-हजारी शिखरे दुसऱ्यांदा सर करणारे जगातील पहिले गिर्यारोहक बनण्याचे निर्मल पुर्जा यांचे लक्ष्‍य होते. त्यासाठी ते कठोर परिश्रम घेत होते. मात्र अखेर त्‍यांचे स्‍वप्‍न अधुरे राहिले.

खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे

'ब्रॉड पीक' हे जगातील १२ वे सर्वात उंच शिखर आहे. अत्यंत कठीण हवामान आणि सततच्या हिमस्खलनाच्या धोक्यामुळे ते सर्वात आव्हानात्मक पर्वतांपैकी एक मानले जाते. अपघाताच्या वेळी या भागात झालेली मुसळधार बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. ड्रोन आणि प्रत्यक्ष जमिनीवरील पथकांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली, परंतु परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. निर्मल पुर्जा यांचे जाणे ही पर्वतारोहण विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी मानली जात असून जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news