Gen Z Work Life Balance: Gen Z चे वर्क लाईफ बॅलेन्स... छानछौकी सोडून कमी पगारातच का मानत आहेत समाधान?

Gen Z Work Life Balance
Gen Z Work Life Balancepudhari
Published on
Updated on

Gen Z Work Life Balance: जंतर मंतर वरील आंदोलनानंतर अख्ख्या देशाने Gen Z नां गांभिऱ्याने घेण्यास सुरूवात केली आहे. या जनरेशन झेडचे अनेक नवे अन् प्रवाहाच्या विरूद्धचे फंडे आहेत. या फंड्याचे मिलेनियल्स आणि बूमर्स यांना नक्कीच आश्चर्य वाटत असेल. जेन झी ही पैशाच्या मागे वेडी असलेली पिढी नाही.

सोम्या पांडे नावाच्या एका Gen Z मुलीला सोशल मीडिया एन्ट्रन्शिप मिळाली होती. ती देखील घरून काम करण्याच्या मुभेसह... मात्र यासाठी दिवसातील १० तास द्यावे लागणार होते. अन् महिन्याला ३ हजार रूपये स्टायपेंड मिळणार होता. सोम्या ही बनारस हिंदू विद्यापीठातील पोस्ट ग्रॅज्यएशनची विद्यार्थिनी होती.

Gen Z Work Life Balance
Gen Z Diet | 'जेन झी'च्या नजरेतून माझा कालबाह्य आहार

याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सोम्या म्हणाली की, 'निवड करणं खूप सोपं होतं. जर नाही म्हणाले तर ३ हजार रूपये कमवण्याची संधी जाणार, जर हो म्हणाले तर जवळपास पूर्ण दिवस मी कामात असणार अन् त्या बदल्यात फार कमी पैसे मिळणार.'

सोम्याने माघार घेतली. मात्र तिला एक जाणीव झाली की जेन झीसाठी हा प्रश्न फक्त हार्ड वर्क करण्याचा नाहीये. तिने विचार केला की देत घेत असलेले कष्ट, त्याचा मोबदला याचा समतोल आहो का? जास्त कष्ट केले तर त्याची किंमत असणार आहे का?

Gen Z Work Life Balance
Gen Z CD Sales Surge: जेन झीमध्ये अचानक वाढला CD खरेदीचा ट्रेंड.. तब्बल १६.३ मिलियन युनिट्स विकले; नेमकं कारण काय?

याबाबत मानसशास्त्रज्ञ हेमांगी महापोरळकर यांनी एक मुद्दा अधोरेखित केला. त्यांनी 'सोशल मीडिया एक्सपोजर, ई-कॉमर्स आणि कमाईची वाढलेली क्षमता यामुळं पैसा काय कधीही मिळवता येईल अशी एक धारणा झाली आहे. मात्र जेन झींनी या प्रचाराची व्याख्या नव्याने लिहिली आहे.'

आपले आजोबा आणि पालक ज्या लाईफस्टाईलमध्ये रहात होते आणि आताची लाईफस्टाईल यात अमुलाग्र बदल झाला आहे. आपण जे जगले आणि आपली मुलं जे जगत आहेत त्या देखील मोठा बदल झाला आहे. आपल्याला अजून चांगली जीवन हवं होतं. आपल्याला ते करणं शक्य देखील होतं. मात्र ते चांगल जीवन म्हणजे सतत काहीतरी मोठं किंवा बडेजाव असलेलं करणं नाही. ते तुम्ही सतत उपलब्ध असणं ही त्या नोकरीची डिमांड असेल अशी नोकरी नाकारण्यात देखील आहे. जिथं आदरयुक्त भितीची अपेक्षा केली जाते. मात्र जेन झी किंमत चुकवायला तयार आहेत.

Gen Z Work Life Balance
Gen z fake Wedding Trends: दारात मांडव, लगीनघाई अन् पंगती... पण नवरा-नवरीच नाही! 'जेन-झी'मध्ये का वाढतोय 'फेक वेडिंग'चा ट्रेंड

अनेक दशकांपासून पहिल्यांदाच जेन झी कर्मचारी हे खुलेपणाने या प्रोफेशनल आयुष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मुस्कान खंडेलवाल यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला की त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा महागड्या गोष्टी खरेदी करण्याबाबत विचार करावा लागला. कारण त्यांना त्यांच्या आर्थिक स्थैर्याकडं लक्ष द्यायचं होतं. त्याचवेळी त्यांना मोठ्या पगारासाठी त्यांचे मानसिक आरोग्य देखील गमवायचं नव्हतं.

मुस्कान या पीआर आणि कम्युनिकेशन प्रोफेशनल्स आहेत. त्या म्हणाल्या की, 'ज्या ठिकाणी मी माझे काम एन्जॉय करेन त्या ठिकाणी हळूहळू ग्रो करेन मात्र मी जिथं जास्त पैसे मिळतात मात्र तिथंल वातावरण मला प्रत्येक दिवशी थकवा जाणवेल असे असेल तर मी तो पर्याय निवडणार नाही.

Gen Z Work Life Balance
Gen Z Protests : 'पंतप्रधान ही केवळ व्यक्ती नसून एक संस्था; शिवीगाळ करणे अयोग्य' : जेन-झी आंदोलनावर स्मृती इराणींचे परखड मत

याबाबत बोलताना मानसशास्त्रज्ञ प्रणय अग्रवाल म्हणतात की शिक्षणाची आणि नोकरीच्या वाढलेल्या संधी या लोकांना क्रयशक्तीची चांगली ताकद देतात. अनेकजण यासाठी आपले स्वातंत्र्य छानछौकीसाठी बाजूला ठेवतात. काही एक पाऊल मागं येऊन आपला वैयक्तिक स्वार्थाला किंवा वैयक्तिक गोष्टींना महत्व देतात. त्यांच्यासाठी स्वतःची प्रतिमा ही संकल्पना ड्राईव्ह करत नाही. ते काही निर्णय ठरवून आणि मुद्दाम घेतात.'

Gen Z Work Life Balance
Gen Z Voters: दोन वर्षांपासून ‘जेन-झी’ला मतदानाचा ब्रेक! आयोगाच्या नोंदणी प्रक्रियेत जन्मतारखेचा अडथळा

मात्र प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते. आता भारतीय वर्कप्लेसेस हे जेन झींच्या मानसिकतेशी जुळवून घेत आहेत. त्यामुळं पगारातील तफावत निर्माण होत आहे आणि खिशाला देखील चाट बसत आहे. अपर्णा मुंदानी यांनी कमी पैशात काम करणं अवघड आहे. मात्र अशावेळी स्ट्रेटेजिक इनव्हेस्टमेंट कामाला येते.

अपर्णा सल्ला देतात की, 'आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमची गुंतवणूक महत्वाची ठरते. तुम्ही तुमच्या पगारातील काही भाग हा गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोत टाकत रहा. गुंतवणूक करणे हे कधीही चांगले. तुम्हाला तुमचा वेळ हवा असेल तर तो एक सोपा मार्ग आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news