Political News: कट्टर वैरी एकत्र येणार! महाराष्ट्राप्रमाणेच प. बंगालमध्येही 'महाविकास आघाडी'चा प्रयोग?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार प्रकरणानंतर बंगालमधील दोन कट्टर वैरी डावे आणि तृणमूल एकत्र येण्याची शक्यता
TMC Left Alliance
TMC Left Alliance pudhari
Published on: 
Updated on: 

West Bengal Politics: शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त... असाच प्रकार काहीसा पश्चिम बंगालच्या राजकारणात पहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ममता बॅनर्जी या आता डाव्यांसोबत जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे आपली अस्तित्वाची लढाई लढणारे डावे पक्ष आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरूद्ध एकत्र येत आहेत.

TMC Left Alliance
Election Commission : निवडणूक आयोग स्वतंत्र असण्यासोबतच तसा दिसायलाही हवा : न्यायमूर्ती दीपांकर दत्ता

बंगालमध्येही महाविकास आघाडी?

मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआयएम यांच्यात चर्चेचा मार्ग खुला झाला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या संपर्कात असून दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचे संस्थापक सदस्य आहेत. असं असलं तरी दोन्ही पक्षांनी याबाबत औपचारिक बोलणं टाळलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की ममता बॅनर्जी यांनी विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्याशी देखील चर्चा तेली आहे. पुढच्या आठवड्यात इंडिया आघाडीची बैठक बोलवण्याची विनंती केली आहे.

TMC Left Alliance
Election Commission : अंतर्गत टिपण्या ही नियमित प्रक्रिया, गेल्या वर्षभरातील सर्व निर्णय एकमताने निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

भाजप विरोधी पक्षांना लिहिले पत्र

दोन दिवसांपूर्वीच सीपीआय एमचे महासचिवांनी ममता आणि इंडिया आघाडीच्या इतर पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिलं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी डाव्या पक्षांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर दिलं. त्यांनी सहमती दर्शवत खरोखरच मोठी स्थिती निर्माण झाली आहे हे मान्य केलं.

TMC Left Alliance
Gyanesh Kumar Controversy: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून NDA मध्ये नाराजी; भाजपच्या मित्रपक्षांनीच केली मोठी मागणी

पत्रात काय होते?

डाव्या नेत्यांनी २३ सप्टेंबरला पाठवलेल्या पत्रात लिहिलं की, 'तुम्हाला माहिती आहेच की २३ सप्टेंबर २०२६ रोजी इंडियन एक्सप्रेसने निवडणूक आयोगावर एक मोठी बातमी छापली होती. त्यावरून असं लक्षात येतं की निवडणूक आयोग एखाद्या हुकूमशहासारखा काम करत आहे. ही नक्कीच एक मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग लोकशाहीच्या विश्वासार्हतेलाच पणाला लावत आहे. निवडणूक आयोग आपल्या कामकाजापासून आपण घेतलेल्या प्रत्येक आक्षेपांकडे काना डोळा करत आहे. ते SIR प्रक्रिया पुढे रेटत आहेत. १३ कोटी लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे.

TMC Left Alliance
CEC Gyanesh Kumar: ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण पुरस्कार द्या’; भाजप नेत्याची अजब मागणी

लवकरात लवकर INDIA आघाडीची बैठक

सीपीआय एम नेत्यांनी सांगितलं की लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी लोक विरोधी पक्षांकडे पाहत आहेत. विरोधी पक्षांनी मिळून सहमतीने बैठकीसाठी तारीख आणि ठिकाण निश्चित केलं पाहिजे. याच्यावर चर्चा करता येऊ शकते. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीआरएस, आम आदमी पार्टी, डीएमके, विजय यांचा पक्ष टीव्हीके, बीजेडी, कॉकरोज जनता पार्टी या सर्व पक्षांना पत्र लिहिलं आहे. डाव्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना सांगितलं की लवकरात लवकर इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली पाहिजे. त्यात एक रणनिती तयार केली गेली पाहिजे अशी मागणी होत आहे.

TMC Left Alliance
Election Commission : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार बनावे : राहुल गांधी

विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला आहे. कॉकरोज जनता पार्टीने ४८ तासाचा अल्टीमेटम दिला आहे. आत तो अल्टीमेट संपुष्टात येणार आहे. त्यानंतर आता २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news