CEC Gyanesh Kumar: ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण पुरस्कार द्या’; भाजप नेत्याची अजब मागणी

एका बाजूला ज्ञानेश कुमार यांच्यावर टिकेची झोड उठत असताना, भाजप नेत्याने त्यांचे तोंडभरून कौतुक केले असून, त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
CEC Gyanesh Kumar
CEC Gyanesh KumarFile Photo
Published on: 
Updated on: 

CEC Gyanesh Kumar:

कोलकाता: पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे तोंडभरून कौतुक केले असून, त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. एका बाजूला ज्ञानेश कुमार यांच्यावर टिकेची झोड उठत असताना, भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले सामिक भट्टाचार्य?

सामिक भट्टाचार्य म्हणाले की, "वस्तुस्थिती अशी आहे की, खुद्द काँग्रेस पक्षसुद्धा राहुल गांधींच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांना गांभीर्याने घेत नाही. ज्ञानेश कुमार यांना किमान 'पद्मभूषण' पुरस्कार मिळायलाच हवा. इतक्या कालावधीनंतर पश्चिम बंगालमध्ये भीतीचे वातावरण दूर राहिले, याचा येथील जनतेला आनंद आहे."

CEC Gyanesh Kumar
Sonia Gandhi controversy : ‘राहुल गांधी मदारी! त्यांच्या आईने नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदान कसे केले?’ : भाजपचा घणाघात

पुढे बोलताना ते म्हणाले की, "या निवडणुकीत हत्येची कोणतीही घटना घडली नाही आणि लोकांना शांततेत मतदान करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, सीमावर्ती राज्य असूनही मतदार याद्यांमधून बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी विशेष पुढाकार घेतला. पश्चिम बंगालच्या जनतेने अशी शांततापूर्ण निवडणूक क्वचितच पाहिली असेल. म्हणूनच, राज्यातील सामान्य जनता ज्ञानेश कुमार यांना पूर्ण पाठिंबा देत आहे."

ज्ञानेश कुमारांच्या एकतर्फी निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या इतर आयुक्तांची सहमती किंवा बहुमताचा विचार न घेता परस्पर घेतलेले सर्व निर्णय आणि सॉफ्टवेअरमधील बदल असंवैधानिक आणि अधिकारबाह्य (अल्ट्रा व्हायरस) घोषित करावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वकील शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे

पश्चिम बंगालमधील अपिलांवरही आक्षेप

पश्चिम बंगालमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या मतदार नोंदींना आव्हान देत निवडणूक आयोगाच्या नावाने दाखल करण्यात आलेली १६.१० लाख अपिले रद्द करण्यात यावीत, असे याचिकेत नमूद आहे. या अपिलांना कोणतीही कायदेशीर किंवा वैधानिक मान्यता नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

काँग्रेसची देशभर निदर्शने

मतदार यादी पडताळणी प्रक्रियेत गैरव्यवहाराचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात उग्र निदर्शने केली. आसाममध्ये गौरव गोगोई यांना ताब्यात घेण्यात आले तर मणिपूर आणि चंदीगडमध्ये पोलिसांशी झटापट झाली. निवडणूक आयुक्तांनी नोंदवलेल्या अंतर्गत आक्षेपांनंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी तीव्र केली आहे.

CEC Gyanesh Kumar
CJP Protest: ... तर 2 ऑक्टोबरपासून देशभर आंदोलन करणार; अभिजीत दीपकेचा मोठा इशारा, CJP पुन्हा रस्त्यावर उतरणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news