UPSC Prelims 2026: 56 पानांचा पेपर, लांबलचक प्रश्न आणि वेळ कमी... GS पेपरने उमेदवारांसह अधिकाऱ्यांनाही फोडला घाम

UPSC Prelims 2026: UPSC Prelims 2026 मधील GS Paper 1 हा अत्यंत कठीण, लांबलचक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी दिली आहे.
UPSC Prelims 2026
UPSC Prelims 2026Pudhari
Published on
Updated on

UPSC Prelims 2026: आता अजून एक प्रयत्न करावा की सोडून द्यावं?... UPSC ची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनात रविवारी हाच प्रश्न होता. UPSC Civil Services Preliminary Examination 2026 ची परीक्षा दिल्यानंतर अनेक उमेदवार प्रचंड निराश आणि संभ्रमात दिसले. विशेषतः General Studies (GS) Paper 1 हा पेपर अत्यंत कठीण, लांबलचक आणि गोंधळात टाकणारा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

2022 पासून UPSC ची तयारी करणाऱ्या अनुभव गुप्ता या विद्यार्थ्याने परीक्षेनंतर सोशल मीडियावर पोस्ट करत, “आता थांबायचं का, की अजून एक प्रयत्न करायचा?” असा प्रश्न विचारला. चार प्रयत्न झाल्यानंतर त्याच्यासारखे अनेक विद्यार्थी या परीक्षेनंतर खचलेले दिसत आहेत.

‘आतापर्यंतचा सर्वात कठीण UPSC Prelimsचा पेपर’

UPSC मार्गदर्शक आणि Sleepy Classes चे संस्थापक शेखर दत्त यांनी सोशल मीडियावर ही परीक्षा “आतापर्यंतच्या सर्वात कठीण UPSC Prelims पैकी एक” असल्याचे म्हटले. रायपूरमधील IAS अधिकारी अवनीश शरण यांनीही “UPSC Prelims 2026: The toughest ever” अशी प्रतिक्रिया दिली. दत्त यांच्या मते, या वेळी खरी अडचण फक्त माहिती असण्यात नव्हती, तर वेगवेगळ्या तथ्यांमधील संबंध समजून घेणे आणि मर्यादित वेळेत योग्य निर्णय घेणे ही मोठी कसोटी होती.

पेपर कठीण की फक्त अनपेक्षित?

UPSC ची परीक्षा नेहमीच अनपेक्षित प्रश्नांसाठी ओळखली जाते. मात्र यंदाच्या GS पेपरने अनेक उमेदवारांना पूर्णपणे गोंधळात टाकल्याचं दिसून आलं. काही शिक्षकांच्या मते, पेपर फक्त कठीण नव्हता, तर अत्यंत अनपेक्षित (Unpredictable) होता. प्रश्नांचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला दिसला. यापूर्वी सरळ प्रश्न विचारले जात असताना यंदा अनेक प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या तथ्यांना A, B, C अशा स्वरूपात जोडून संबंध शोधण्यास सांगितले गेले.

GS पेपर एवढा लांबलचक का वाटला?

शेखर दत्त यांच्या मते, यंदाच्या पेपरमधील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रश्नपत्रिकेची लांबी. पूर्वी 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका साधारण 40 पानांची असायची. मात्र यंदा ती 56 पानांपर्यंत पोहोचली. काही पानांवर फक्त दोनच प्रश्न होते, कारण प्रत्येक प्रश्न खूप मोठा आणि वेळखाऊ होता.

त्यांनी सांगितले की, “पूर्वी एका पानावर सात-आठ प्रश्न असायचे. आता एका MCQ साठी जवळपास अर्धं पान वाचावं लागत होतं.” याचा परिणाम असा झाला की, अनेक उमेदवारांना सर्व प्रश्न सोडवता आलेच नाहीत. एका विद्यार्थिनीने सांगितले की, विषय माहित असूनही ती 100 पैकी फक्त 66 प्रश्न सोडवू शकली.

अभ्यास करूनही उमेदवार खचले?

अनेक तज्ज्ञांच्या मते, यंदाचा पेपर चांगली तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनाही अवघड गेला आहे. कारण फक्त अभ्यास पुरेसा नव्हता, तर कमी वेळेत मोठ्या प्रमाणात माहिती वाचून निर्णय घ्यायचा होता.

UPSC Prelims 2026
UPSC Exam : यूपीएससी परीक्षेला ३४ टक्के उमेदवार गैरहजर

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचा वाद

काही विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की, GS Paper 1 मध्ये UPSC च्या अधिकृत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नही विचारले गेले. 22 वर्षीय रंजन कुमार या उमेदवाराने सांगितले की, एक प्रश्न Ethics and Integrity या विषयासारखा वाटत होता, जो प्रत्यक्षात Mains परीक्षेचा भाग आहे, Prelims चा नाही.

दिल्लीतील UPSC मार्गदर्शक अमित किल्होर यांनी यावर टीका करत म्हटले की, “कठीण परीक्षा म्हणजे अभ्यासक्रमात खोलवर जाणारे प्रश्न. पण यावेळी अस्पष्ट आणि अनपेक्षित प्रश्न जास्त दिसले.”

8 लाखांहून अधिक उमेदवारांची परीक्षा

UPSC ने 24 मे रोजी देशभरात 8 लाखांहून अधिक नोंदणीकृत उमेदवारांसाठी Civil Services Preliminary Examination 2026 आयोजित केली होती. या परीक्षेत सकाळी GS Paper 1, तर दुपारी CSAT Paper 2 घेण्यात आला. दुपारच्या CSAT पेपरबाबत मिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या, तरी चर्चेचा केंद्रबिंदू GS पेपरच राहिला.

UPSC Prelims 2026
Travis Head: विराट कोहलीसोबत वाद! ट्रेविस हेडच्या कुटुंबाला शिवीगाळ? पत्नी जेसिकाचा संताप; नेमकं काय घडलं?

आता Answer Key कडे लक्ष

विशेष म्हणजे, UPSC ने यंदा प्रथमच प्राथमिक परीक्षेनंतर तात्पुरती Answer Key लवकर प्रसिद्ध केली जाईल, असे सांगितले आहे, ज्यावर उमेदवार आक्षेपही घेऊ शकतील. दरम्यान, UPSC 2026 Prelims ने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, ही परीक्षा फक्त ज्ञानाची नाही, तर संयम, वेग, समज आणि मानसिक ताकदीचीही कसोटी आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पेपर निराशाजनक ठरला असला, तरी UPSC ची अनिश्चितता हीच तिची खरी ओळख असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news