UPSC Exam : यूपीएससी परीक्षेला ३४ टक्के उमेदवार गैरहजर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी (दि. २४) नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली.
UPSC Exam
UPSC Exam : यूपीएससी परीक्षेला ३४ टक्के उमेदवार गैरहजरfile photo
Published on
Updated on

34 Percent of Candidates Absent from UPSC Exam

संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी (दि. २४) नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. शहरातील वीस परीक्षा केंद्रांवरून दोन सत्रात ही परीक्षा झाली. नोंदणी केलेल्यांपैकी ६६ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सुमारे ३४ टक्के विद्यार्थी गैरहजर राहिले. शहरातील विविध केंद्रांतून सुमारे तीन हजार नऊशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

UPSC Exam
NEET exam : शहरातील ५० केंद्रांवर १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून परीक्षेसाठी ५८४२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. परीक्षेच्या अनुषंगाने २० परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजेदरम्यान अशा दोन सत्रांत घेण्यात आली. सकाळी ८ वाजेनंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येत होते.

आयोगाच्या सूच नेप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. सकाळच्या सत्रात ३ हजार ९०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १ हजार ९३८ परीक्षार्थी गैरहजर होते.

दुपारच्या सत्रात गैरहजर राहण्याचे प्रमाण काहीसे वाढले. दुपारच्या सत्रात ३ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १ हजार ९७४ परीक्षार्थी विद्यार्थी गैरहजर होते. सकाळच्या सत्रात उपस्थितीचे प्रमाण ६६.८२ टक्के, तर दुपारच्या सत्रात ६६.२१ टक्के उपस्थितीचे प्रमाण होते. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नांच्या काठिण्य पातळीवरील चर्चेसह गैरहजरीचे प्रमाणही चर्चेत होते.

UPSC Exam
12th Exam Result : संभाजीनगर विभागाचा निकाल २% घसरला

जिल्हा प्रशासनासह परीक्षेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त कार्यालयाकडूनही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्राबाहेर परीक्षार्थीच्या पालकांचीही गर्दी होती. वाढत्या तापमानामुळे सावलीच्या शोधात परीक्षा केंद्राजवळील झाडाखाली पालकांनी आसरा घेतल्याचे चित्र होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news