UPSC Calendar 2027: UPSCचे परीक्षा वेळापत्रक जाहीर! सिव्हिल सर्व्हिस, NDA, CDS परीक्षा कधी होणार? जाणून घ्या सर्व माहिती

UPSC Calendar 2027: UPSC ने 2027 साठीचं परीक्षा कॅलेंडर जाहीर केलं असून सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा 23 मे 2027 रोजी होणार आहे.
UPSC Calendar 2027
UPSC Calendar 2027Pudhari
Published on
Updated on

UPSC Calendar 2027: देशातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. Union Public Service Commission म्हणजेच UPSC ने 2027 वर्षासाठीचं परीक्षा कॅलेंडर जाहीर केलं आहे. यामध्ये सिव्हिल सर्व्हिस (IAS), NDA, CDS, इंजिनिअरिंग सर्व्हिसेससह अनेक महत्त्वाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

UPSC च्या नव्या कॅलेंडरनुसार, सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा 23 मे 2027 रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षा (Mains) 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होऊन पाच दिवस चालणार आहे. भारतीय वन सेवा (IFS) प्रारंभिक परीक्षा देखील सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्ससोबतच घेतली जाणार आहे.

NDA आणि CDS परीक्षा कधी?

संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NDA आणि CDS परीक्षांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.

  • NDA/NA परीक्षा (I) – 11 एप्रिल 2027

  • NDA/NA परीक्षा (II) – 19 सप्टेंबर 2027

त्याचप्रमाणे,

  • CDS परीक्षा (I) – 11 एप्रिल 2027

  • CDS परीक्षा (II) – 19 सप्टेंबर 2027

इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षा कधी?

इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रिलिम्स परीक्षा 31 जानेवारी 2027 रोजी, तर मुख्य परीक्षा 18 जून 2027 रोजी होणार आहे.

इतर महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा

संयुक्त भू-वैज्ञानिक (Prelims) परीक्षा 2027

  • नोटिफिकेशन: 2 सप्टेंबर 2026

  • अर्जाची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026

  • परीक्षा: 31 जानेवारी 2027

CBI (DSP) LDCE परीक्षा

  • नोटिफिकेशन: 16 डिसेंबर 2026

  • अर्जाची अंतिम तारीख: 5 जानेवारी 2027

  • परीक्षा: 27 फेब्रुवारी 2027

UPSC Calendar 2027
Raja Shivaji Day 20: ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 20 व्या दिवशीही कोट्यवधींची कमाई, इतिहासापासून फक्त 12 कोटी दूर

CISF AC (Executive) LDCE परीक्षा

  • नोटिफिकेशन: 25 नोव्हेंबर 2026

  • अर्जाची अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2026

  • परीक्षा: 13 आणि 14 मार्च 2027

IES/ISS परीक्षा 2027

  • नोटिफिकेशन: 10 फेब्रुवारी 2027

  • अर्जाची अंतिम तारीख: 2 मार्च 2027

  • परीक्षा: 18 ते 20 जून 2027

CAPF (AC) परीक्षा 2027

  • नोटिफिकेशन: 17 फेब्रुवारी 2027

  • अर्जाची अंतिम तारीख: 9 मार्च 2027

  • परीक्षा: 4 जुलै 2027

Combined Medical Services परीक्षा 2027

  • नोटिफिकेशन: 3 मार्च 2027

  • अर्जाची अंतिम तारीख: 23 मार्च 2027

  • परीक्षा: 18 जुलै 2027

UPSC Calendar 2027
MS Dhoni CSK Playoffs: ‘थाला’ पुन्हा खेळणार? CSK कोचने दिली धोनीबाबत मोठी अपडेट; 'या' एका कारणामुळे संघाबाहेर

UPSC Calendar 2027 कसं डाउनलोड कराल?

UPSC चं अधिकृत परीक्षा कॅलेंडर डाउनलोड करण्यासाठी:

  1. UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. होमपेजवरील ‘Examination’ विभागावर क्लिक करा.

  3. त्यानंतर ‘Calendar’ पर्याय निवडा.

  4. ‘Annual Calendar 2027’ फाइल उघडून डाउनलोड करा.

Direct Link to Check UPSC 2027 Examination Calendar

UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळे तयारीचं नियोजन करण्यासाठी उमेदवारांनी तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news