

Vijay won the floor test: तमिळ नाडूचे निवनिर्वाचित मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडू विधानसभेत बहूमत सिद्ध केलं आहे. विजय यांच्या समर्थनात १४४ मते पडली आहेत. बहूमताचा आकडा हा ११८ इतका होता. विशेष म्हणजे ऐत्यावेळी विजय यांना अण्णा द्रमुकच्या काही आमदारांच्या गटाने पाठिंबा दिला. पक्षाचे सचिव पलनिस्वामी यांनी इशारा देऊन देखील या बंडोखर आमदारांनी विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे.
विजय यांना सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके, आययुएमएल. एएमएमके या पक्षांनी यापूर्वीत पाठिंबा दिला होता. त्यामुळं त्यांनी आधीच बहुमताचा आकडा पार केला होता. त्यात आता अण्णा द्रमुकच्या आमदारांनी देखील पाठिंवा दिला. बहुमताची चाचणी सुरू असताना प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता.
टीव्हीके: 105
काँग्रेस : 5
सीपीआय: 2
सीपीआयएम: 2
आययुएमएल: 2
व्हीसीके: 2
एएमएमके: 1
AIADMK बंडखोर आमदार : 25
दुसरीकडं केरळमला अजून नवीन मुख्यमंत्री मिळालेला नाही. आता याबाबत निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागून आठवडा झाला आहे. तरी अजून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय झालेला नाही.
अनेक केरळम काँग्रेसचे नेते ज्यात पाच केरळमच्या माजी प्रदेशाध्यक्षांचा देखील समावेश आहे. युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे समन्वयक, केपीसीसी शिस्तपालन समिती प्रमुख आणि तीन केपीसीसी कार्यकारी अध्यक्ष यांनी राहुल गांधी यांची काल भेट घेतली होती. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा केली आहे.
केरळमच्या मुख्यमंत्रीपदासाठी खासदार केसी वेणुगोपाल, के मुरलीधरन आणि व्हीएम सुधीरन यांची नावे आघाडीवर आहेत.
मात्र असं असलं तरी पक्षाने अजून मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. केरळम काँग्रेसचे प्रमुख सनी जोसेफ यांनी सांगितलं की याबाबतचा निरणय लवकरच कळवण्यात येईल.