Tamil Nadu Election TVK: नाव, फोटो, फॅन फोलोईंग वापरायचं नाही... विजयनं आई-वडिलांनाच का ठोकली होती केस?

Tamil Nadu Election TVK
Tamil Nadu Election TVKpudhari
Published on
Updated on

Tamil Nadu Election Vijay TVK: दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता जोसेफ विजयच्या तमिलगा वेट्टरी कझगम अर्थात टीव्हीके पक्षाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मोठी झेप घेतली आहे. तमिळनाडू विधानसभा २०२६ च्या निवडणुकीत टीव्हीकेने १०७ जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. आता थलपती विजय हा तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

मात्र २०२४ मध्ये TVK पक्षाची स्थापना करणाऱ्या विजयला राजकारणात फारसा रस नव्हता. त्याच विजयनं २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत १०७ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. सत्ताधारी डीएमके ७४ तर एनडीए आघाडी ५३ जागांवर घसरली. अवघ्या दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने आपल्या पहिल्याच निवडणुकीत एवढं मोठं यश मिळवलं आहे.

Tamil Nadu Election TVK
Tamil Nadu Election 2026: तामिळनाडूत थलपथीची 'विजयी' सलामी; TVKने निवडणूक कशी जिंकली; कसं केल प्लॅनिंग, A To Z स्टोरी

२०२० मध्ये काय झालं होतं?

मात्र एक काळ असा होता की विजय हा राजकारणात येऊ इच्छित नव्हता. इतकंच नाही तर या विषयाबाबत त्याने आपल्या आई वडिलांना देखील कायदेशीर नोटीस पाठवली होती.

विजयचे वडील एसए चंद्रशेखर यांनी विजय मक्कल इयाकम (VMI) या पक्षाची स्थापना २०२० मध्ये केली होती. त्यांनी अभिनेता विजयच्या फॅन क्लबचे राजकीय पक्षात रूपांतर केलं होत. या पक्षाचे चंद्रशेखर हे जनरल सेक्रेटरी झाले होते. आणि विजयच्या आईला खजीनदार केलं होतं. मात्र हे करताना त्यांनी आपल्या मुलाची परवानगी घेतली नव्हती किंवा त्याला विचारलं नव्हतं.

Tamil Nadu Election TVK
Tamil Nadu election result: एका मताने पराभव; तामिळनाडूच्या मंत्र्याला मोठा धक्का, विजयच्या 'टीव्हीके'ने चारली धूळ

नोटीसच पाठवली

२०२१ च्या सप्टेंबर महिन्यात विजयने ११ लोकांविरूद्ध एक कायदेशीर नोटीस बजावली. या ११ जणांमध्ये त्याचे आई आणि वडिलांचा देखील समावेश होता. त्याने या पक्षाने माझा फोटो, माझे नाव किंवा फॅन क्लबचा राजकीय कार्यासाठी वापर करण्यात येऊ नये अशी मागणी केली होती.

विजयने त्याच्या वडिलांच्या राजकीय महत्वकांक्षेपासून स्वतःला वेगळं केलं होतं. त्याने आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या राजकीय पक्षाशी आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणता संबंध नाही असं जाहीर केलं होतं. मात्र आता त्याचं मतपरिवर्तन झालं आहे.

Tamil Nadu Election TVK
Vijay Thalapathy TVK: विजय थलापतीच्या TVK चा नेमका अर्थ काय; सॉफ्ट हिंदूत्व की सेक्युलरिजम... पक्षाचं धोरण काय?

विजयचा राजकारणात प्रवेश

फेब्रुवारी २०२४ मध्ये विजयने जे वडिलांना हवं होतं तेच केलं. त्याने टीव्हीके पक्ष अधिकृतरित्या सुरू केला. त्याने आपल्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे त्याच वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात नोंदणी केली.

त्याच्या पक्षाच्या मते टीव्हीकेची विचारसरणी ही सेक्युलर धाटणीची असून सामाजिक न्यायावर आधारलेली आहे. हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि के कामराज यांच्या तत्वांना मानणारा पक्ष आहे.

Tamil Nadu Election TVK
Tamil Nadu Election Results 2026: विजय थलपतींच्या घरी जल्लोष.. बर्थडे गर्ल त्रिशा पोहचली चेन्नईच्या घरी

विजयने तमिळनाडू विधानसभा २०२६ मध्येपहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. मात्र त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या फॅन क्लबच्या मार्फत एन्ट्री केली होती. विजय स्वतः पेरांम्बूर आणि तिरूची पूर्वमधून निवडून आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news