bodybuilder varinder singh ghuman: जगातील पहिला शाकाहारी बॉडीबिल्डर आणि सलमानचा सह-कलाकार वरिंदर सिंग घुमन यांचं निधन; जाणून घ्या त्यांचं प्रेरणादायी आयुष्य!

वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वाचा त्यांचा 'मिस्टर एशिया' ते 'टायगर ३' पर्यंतचा प्रवास
bodybuilder Varinder Ghuman Death
bodybuilder Varinder Ghuman Deathbodybuilder varinder singh ghuman
Published on
Updated on

bodybuilder varinder singh ghuman

अमृतसर: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले बॉडीबिल्डर आणि पंजाबी अभिनेता वरिंदर सिंग घुमन यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने क्रीडा आणि मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला आहे.

वरिंदर घुमन यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पुतणे अमनजोत सिंग घुमन यांनी जालंधरमध्ये पत्रकारांना सांगितले की, अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

bodybuilder Varinder Ghuman Death
Punjabi Singer Rajvir Jawanda Dies | पंजाबी गायक राजवीर जवांदाचे निधन, ११ दिवस रुग्णालयात सुरू होती झुंज...

खांद्याच्या दुखण्यामुळे रुग्णालयात दाखल

घुमन यांचे व्यवस्थापक यादविंदर सिंग यांनी सांगितले की, वरिंदर यांना काही दिवसांपासून खांद्याच्या दुखण्याचा त्रास होत होता. याच कारणामुळे तपासणीसाठी त्यांना अमृतसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

'मिस्टर इंडिया' ते 'मिस्टर एशिया' उपविजेते

पंजाबमधील गुरदासपूर येथे जन्मलेल्या वरिंदर सिंग घुमन यांनी बॉडीबिल्डिंगच्या जगात मोठे नाव कमावले होते. २००९ मध्ये त्यांनी 'मिस्टर इंडिया' चा किताब जिंकला. त्यानंतर त्यांनी 'मिस्टर एशिया' स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, त्यांना दिग्गज बॉडीबिल्डर आर्नाल्ड श्वार्झनेगर यांनी आशियामध्ये आपल्या उत्पादनांचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले होते.

जगातील पहिले शाकाहारी बॉडीबिल्डर

मांसाहाराचे सेवन न करता आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्यामुळे घुमन यांची ओळख जगातील पहिले शाकाहारी व्यावसायिक बॉडीबिल्डर म्हणून होती. त्यांची ही निवड भारतीय फिटनेस समुदायासाठी नेहमीच अभिमानाची बाब ठरली आहे.

bodybuilder Varinder Ghuman Death
Vijay Deverakonda Car Accident | 'डोक्याला दुखापत...' कार अपघातानंतर विजयचे पहिले वक्तव्य; दैव बलवत्तर म्हणून वाचला अभिनेता

अभिनयाच्या क्षेत्रातही छाप

बॉडीबिल्डिंगनंतर घुमन अभिनयाच्या क्षेत्रातही उतरले. २०१२ मध्ये त्यांनी 'कबड्डी वन्स अगेन' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याशिवाय, त्यांनी 'रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स (२०१४)' आणि 'मरजावां (२०१९)' सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. नुकतेच, २०२३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'टायगर ३' या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली होती, ज्यामुळे त्यांना अधिक ओळख मिळाली.

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या घुमन यांनी आपल्या फिटनेस दिनचर्या आणि प्रेरणादायक पोस्ट्समधून अनेक तरुण बॉडीबिल्डिंगच्या तरूणांना प्रेरणा दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news