

Vande Mataram New Rules: केंद्र सरकार राष्ट्रीय गीत वंदे मातरंमला राष्ट्रगीत जन गण मन सारखा दर्जा देण्याचा आणि त्यासारखा प्रोटोकॉल तयार करण्याचा विचार करत आहे. एका वृत्तानुसार या महिन्याच्या सुरूवातीला केंद्रीय गृह मंत्रालयाने या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. भारताच्या संविधानानुसार राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत या दोघांनाही एक विशेष सन्मान प्राप्त आहे. मात्र कायदेशीर आणि प्रोटोकॉलच्या बाबतीत दोन्हीमध्ये मोठे अंतर आहे.
राष्ट्रगीत गात असताना उभे राहणे बधनकारक आहे. याचा अपमान केल्यास त्याला राष्ट्रीय सन्माम अपमान निवारण अधिनियम १९७१ अनुसार शिक्षा होते. तर राष्ट्रीय गात वंदे मातरंम गायनावेळी उभे राहणे किंवा एक विशिष्ठ मुद्रा मेंटेन करण्याबाबत कोणतेही कायदेशीर लिखित नियम नाहीयेत.
याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं होतं. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, 'गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रीय गीत गायन नियम आणि निर्देश आणि सन्मानाची पद्धत याबाबत चर्चा झाली. बैठकीत वंदे मातरंम गायनाची वेळ, स्थान आणि पद्धत याबाब स्पष्ट नियम तयार करायला हवेत का? राष्ट्रीय गीत गाण्यापूर्वी राष्ट्रगीतासारखे उभे राहणे बंधनकारक करता येईल का? राष्ट्रीय गीताचा अपमान करणाऱ्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करता येईल का? यावर चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकार वंदे मातरंम बाबत वर्षभर उत्सव साजरा केला जात आहे. भाजपने काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचे म्हणत राष्ट्रीय गीताला कमी दर्जा दिल्याचा आरोप केला आहे.
१९३७ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनावेळी वंदे मातरंम गीताची काही कडवी हटवण्यात आली होती. भाजपनं आरोप केला की यामुळेच विभाजनाची बिजे रोवली गेली. काँग्रेसने भाजपवर इतिहासाची मोडतोड करून तो सांगितला जात आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्याला हवा दिली जात आहे.
वंदे मातरंम बाबत सध्या न्यायालयात देखील लढा सुरू असून विशेष म्हणजे केंद्र सरकारने २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय गीताबाबत कोणतेही दंडात्मक तरतूदीबाबतचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.
बंकीम चंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरंम हे स्वदेशी आंदोलनादरम्यान स्वातंत्र्य चळवळीचे एक स्लोगन झालं होते. आता सरकार या गीताला त्याची गतवैभव मिळवून देणार असल्याचा दावा करत आहे.