MSU Girl Dance: "मी साडी नेसली होती, मग अश्लीलता कुठे?" विद्यापीठात 'धक-धक' गाण्यावर डान्स अन् मोठा राडा; विद्यार्थिनी रडली

Student Saree Dance Viral Video: विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने ‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर साडी नेसून केलेल्या नृत्यावर अश्लीलतेचे आरोप होताच विद्यार्थिनी भावूक झाली.
Vadodara MS University student saree dhak dhak dance Viral Video
Vadodara MS University student saree dhak dhak dance Viral Videofile photo
Published on
Updated on

Vadodara MS University student saree dhak dhak dance Viral Video

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा येथील महाराजा सयाजीराव (एमएसयू) विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 'संस्कार-संगम' हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये एका विद्यार्थिनीने 'धक धक करने लगा' या बॉलिवूड गाण्यावर नृत्य सादर केले होते. यावरून आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महाराजा सयाजीराव विद्यापीठात 'संस्कार संगम' या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने भगवी साडी नेसून बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणे "धक-धक करने लगा"वर नृत्य सादर केले. या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय'ने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

एनएसयूआयने या सादरीकरणाला 'अभद्र' आणि 'अश्लील' म्हटले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अशा प्रकारची सादरीकरणे विद्यापीठाच्या 'संस्कारां'ना काळिमा फासणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा आयोजनांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याची टीकाही संघटनेने केली. "एमएस युनिव्हर्सिटी हे विद्येचे मंदिर आहे, मनोरंजनाचे किंवा अश्लीलतेचे व्यासपीठ नाही," असे एनएसयूआयचे अध्यक्ष अमर वाघेला यांनी स्पष्ट केले.

Vadodara MS University student saree dhak dhak dance Viral Video
Engineer Salary: फक्त 9 रुपये पगारवाढ! इंजिनिअर संतापला, म्हणाला, गुलामासारखं काम करतोय... सोशल मीडियावर मांडली व्यथा

मी तर साडी नेसले होते, मग अश्लीलता कुठे?

या संपूर्ण प्रकरणावर संबंधित विद्यार्थिनीने एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये ती अत्यंत भावूक झाल्याचे दिसत आहे. ती म्हणाली, "मी अभाविपला ओळखत नाही की एनएसयूआयला. मी साडी नेसून डान्स केला होता, त्यात अश्लीलता कुठे होती? कदाचित 'धक-धक' गाण्यावर डान्स करणे ही माझी चूक असावी, पण त्यावर अश्लीलतेचे आरोप होणे चुकीचे आहे."

या प्रकरणावरून आता विद्यापीठ प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. एनएसयूआयने या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. या वादामुळे सध्या विद्यापीठ परिसरात तणावाचे आणि राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.

Vadodara MS University student saree dhak dhak dance Viral Video
Deepak Pawar Urban Naxal: मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार ‘शहरी नक्षलवादी’? सिनेटमधील स्थगन प्रस्तावावरुन नवा वाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news