७५ वर्षीय वर आणि ३० वर्षीय वधूच्या लग्नाला नवे वळण; राणी म्हणाली, माझं कुटुंब आता पूर्ण झालंय..

राणीने पहिल्या पतीसोबत व्हिडिओ व्हायरल करत दिली माहिती
up news
७५ वर्षीय वर आणि ३० वर्षीय वधूच्या लग्नाला नवे वळण; ती म्हणाली, माझं कुटुंब आता पूर्ण झालंय..file photo
Published on: 
Updated on: 

uttar pradesh a new twist in the marriage of 30 year old bride to 75 year old groom womans first husband returns home

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील औरैया येथे ७५ वर्षीय रामसुगर आणि ३० वर्षीय राणी यांच्या होऊ घातलेल्या लग्नाला नवे वळण मिळाले आहे. राणीचा पहिला पती परतल्याने तिने रामसुगर यांच्यासोबत होणारे लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पती परतल्यानंतर राणीने नवा व्हिडिओ जारी करत, ‘आता माझे कुटुंब पूर्ण झाले आहे,’ असे म्हटले आहे.

up news
Bollywood : ‘सुनीता माझं पहिले प्रेम’; कोमल राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदा स्पष्टच बोलला!

नवरात्रीच्या अगदी आधी रामसुगर आणि राणी यांचा थाटामाटात साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोघांच्या हळद आणि मेहंदीचे विधीही पार पडले होते. या सोहळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र, आता राणीचा पहिला पती परतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे रामसुगर यांची मुलगी राधा हिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राणीने शुक्रवारी एक नवा व्हिडिओ जारी केला. साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचा पती परत आल्याचे तिने सांगितले. साखरपुड्याच्या विषयावरून आपल्या घरात मोठे भांडण सुरू असल्याचेही तिने म्हटले आहे. तिच्या पतीचे म्हणणे आहे की, घटस्फोट न घेता ती दुसरे लग्न कसे करू शकते?

यावर राणी म्हणाली, “आता आम्हीही त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा लग्न करायचे झाले, तरी त्यांच्याशीच करणार. रामसुगर यांच्यासोबत झालेला साखरपुडाही रद्द करण्यात आला आहे.”

up news
Operation Trident : अमित शाह यांचा अमली पदार्थ तस्करांना दणका! ३८ ठिकाणी छापे; १,४२४ बँक खाती गोठवली

राणीने सांगितले की, राधा आपल्या वडिलांशी लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत आहे; मात्र आपण हे लग्न करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीकडे इशारा करत तिने, “हेच माझे पती आहेत,” असे सांगितले.

“ज्या वेळी मला वाटत होते की, माझ्यासोबत कोणीही नाही, त्या वेळी मी राधाशी बोलले होते आणि रामसुगर यांच्याशी लग्न करण्याचा विचार केला होता. आता माझे पती परत आले आहेत. माझे कुटुंब पूर्ण झाले आहे. आता मला इतर कोणाशीही काही देणेघेणे नाही,” असे राणीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पतीला फुलांचा हार घातला, पुन्हा विवाहही केला

राणीने नव्या व्हिडिओमध्ये आपल्या पतीला फुलांचा हार घातल्याचे दिसत आहे. दोघांनी पुन्हा विवाह केल्याचेही व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. यावेळी पतीने राणीच्या भांगात सिंदूर भरला. या व्हिडिओमध्ये दोन मुलेही दिसत आहेत.

मुलांकडे इशारा करत राणी म्हणाली, “आता माझे कुटुंब पूर्ण झाले आहे. मला आता कोणाशीही काही देणेघेणे नाही.” तिने राधाला आपल्याबद्दल यापुढे ब्लॉग किंवा व्हिडिओ तयार करू नयेत, असेही सांगितले. तसेच आपल्या कौटुंबिक आयुष्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका तिने मांडली. राधा, तिची बहीण आणि तिचे वडील यांच्याशी आता आपला कोणताही संबंध ठेवायचा नसल्याचेही राणीने स्पष्ट केले.

साखरपुडा आणि हळद-मेहंदीचे व्हिडिओ झाले होते व्हायरल

७५ वर्षीय रामसुगर आणि ३० वर्षीय राणी यांच्या साखरपुड्याचे तसेच हळद आणि मेहंदीच्या विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नवरात्रीनंतर दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती. या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते.

मात्र, हे सर्व केवळ ब्लॉग तयार करण्यासाठी आणि सोशल मीडियावर लाइक्स व व्ह्यूज मिळवण्यासाठी केले जात असल्याचा दावा काही जणांनी केला होता. रामसुगर यांनी हा दावा फेटाळून लावला होता. आपला विवाह केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी नसून आपण लवकरच लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तसेच, आपल्या साखरपुड्याला केवळ लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचा प्रकार म्हणणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, आता राणीचा पहिला पती परतल्याने तिने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news