Bollywood : ‘सुनीता माझं पहिले प्रेम’; कोमल राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदा स्पष्टच बोलला!

गोविंदा-सुनीता यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री? अफेअरच्या आरोपांवर अभिनेत्याचा मोठा खुलासा
Bollywood
Bollywood : ‘सुनीता माझं पहिले प्रेम’; कोमल राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदा स्पष्टच बोलला!file photo
Published on: 
Updated on: 

entertainment govinda on extra marital affair allegation divorce sunita ahuja in his latest interview

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील तणावाच्या चर्चांना गेल्या काही काळापासून उधाण आले आहे. सुनीता यांनी गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा अनेकदा दावा केला आहे. मात्र, गोविंदाने हे आरोप फेटाळले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने या सर्व आरोपांवर तसेच घटस्फोटाच्या चर्चेवर स्पष्टपणे भाष्य केले आहे.

Bollywood
Sea Buckthorn : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं 'लडाखच्या सोन्या'चं रहस्य; 'हे' कोणत सुपरफूड?

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’ अर्थात गोविंदा केवळ आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर उत्कृष्ट नृत्यासाठीही ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ॲक्शन, कॉमेडीपासून खलनायकाच्या भूमिकेपर्यंत त्याने विविध भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. व्यावसायिक आयुष्यासोबतच तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

सुनीता माझे पहिले प्रेम : गोविंदा

गोविंदाने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्याने पत्नी सुनीता आहुजा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तसेच अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबतच्या कथित अफेअरच्या आरोपांबद्दल भाष्य केले. कोमल गोविंदाच्या ‘रूपा’ या चित्रपटातही दिसणार आहे.

या मुलाखतीत गोविंदाने सुनीता यांचा वेगळे राहण्याचा निर्णय आणि घटस्फोटाच्या चर्चेवरही आपली भूमिका मांडली. सुनीता जे काही करत आहेत, ते त्यांच्या मुलांसाठी करत असल्याचे त्याने सांगितले. सुनीता यांना आपले पहिले प्रेम संबोधत गोविंदा म्हणाला की, प्रेम हा काही खेळ नाही.

Bollywood
Wings Over Ganga : वाराणसीच्या आकाशात आज राफेल, तेजसचा थरार! 'विंग्स ओव्हर गंगा' एअर शोला PM मोदींची उपस्थिती

यावेळी त्याने आपल्या संसारात तिसऱ्या व्यक्तीमुळे फूट पडल्याचा आरोपही केला. मात्र, या व्यक्तीचे नाव सांगणे त्याने टाळले.

गोविंदाच्या कुटुंबाची एवढी बदनामी का?

विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांबद्दल विचारले असता गोविंदाने म्हटले, “वेळ... समाजासमोर असा पडदा कधीच उघडत नाही की ज्यामुळे लोकांना संपूर्ण जगासमोर लज्जित व्हावे लागेल. सत्य हे आहे की, मी आठ-नऊ वर्षांपूर्वीच एका व्यक्तीला सांगितले होते की, माझ्यावर असा काळ येईल आणि त्याचे परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागतील. असे कुणीतरी लिहिले असेल, तर ते घडणारच. ज्याने हे लिहिले आहे, तो सामान्य व्यक्ती नाही.”

यावेळी गोविंदाने यापूर्वी केलेल्या एका भविष्यवाणीचाही उल्लेख केला.

सुनीताच्या डोळ्यांवर पडदा पडला आहे : गोविंदा

गोविंदा पुढे म्हणाला, “बदनामी ही नेहमीच माझ्या नावाचा एक भाग राहिली आहे. माझे नावच असे आहे. कुणीतरी माझ्यावर प्रेम केले, तर कुणीतरी माझ्या नावासोबत अशी भविष्यवाणी केली की, तू धोका देशील.”

यावेळी गोविंदाने पत्नी सुनीता यांना भाग्यवान आणि लक्ष्मी संबोधले. त्यांच्या सहकार्यामुळेच आपण आज या स्थानापर्यंत पोहोचल्याचे सांगत त्याने त्यांच्याप्रति कृतज्ञताही व्यक्त केली. मात्र, सुनीताच्या डोळ्यांवर पडदा पडला असल्याचेही गोविंदाने म्हटले. कोणाच्या प्रभावाखाली येऊन सुनीता असे वागत आहेत, त्या व्यक्तीचे नाव मात्र त्याने उघड केले नाही.

घटस्फोटाच्या चर्चेवर गोविंदाचे स्पष्ट वक्तव्य

मुलाखतीदरम्यान गोविंदाला सुनीता आहुजा यांच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “तो घेतला... घ्यावाच लागेल. त्या कशा घेणार नाहीत?”

यानंतर गोविंदाला, “धमकी देऊन घेतला की प्रेमाने?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिले, “नाही, नाही. आम्ही हिंदू आहोत आणि आमच्याकडे घटस्फोट हा शब्दच नाही. आमच्यामध्ये सर्व व्यवस्था आहेत.”

सुनीता यांची समजूत काढण्याबाबत विचारले असता गोविंदा म्हणाला, “मी जसा आहे, तसाच आहे. मला असे वाटते की, तुम्ही स्वतःच्या जागेवरून हललात, तर स्वतःच्या सामर्थ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण कराल. भविष्यात मला कोणी प्रश्न विचारावेत, असे मला वाटत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news