US Marines Deployment: मध्य पूर्वेत तणाव वाढला; इराणकडे 5 हजार मरीन कमांडो पाठवण्याची अमेरिकेची तयारी

युद्धनौकांची हालचाल सुरू; संकट वाढल्यास थेट कारवाईसाठी अमेरिकन सैन्य सज्ज
US Marines Deployment
US Marines DeploymentPudhari
Published on
Updated on

मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने अमेरिका 5,000 अतिरिक्त मरीन व नौसैनिक पाठवणार

जपानस्थित 31 मरीन एक्स्पेडिशनरी युनिट संकट प्रतिसादासाठी तैनात

‌‘यूएसएस ट्रिपोली‌’, ‌‘यूएसएस सॅन दिएगो‌’ आणि ‌‘यूएसएस न्यू ओरलिन्स‌’ या युद्धनौकांचा सहभाग

US Marines Deployment
UAE Flight Restrictions : 'संयुक्त अरब अमिराती' कडून विमान उड्डाणांवर निर्बंध; एअर इंडिया, इंडिगोच्या प्रवाशांना मोठा फटका!

दुबई : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली असून, अमेरिकेने या भागात सुमारे 5,000 अतिरिक्त मरीन कमांडो आणि नौसैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कमांडो आणि नौसैनिक कोणत्याही क्षणी इराणच्या भूमीवर उतरून आक्रमण करण्यासाठी सज्ज असतील, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही तैनाती युद्धातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेने या निर्णयाला धोरणात्मक तयारीचा भाग असल्याचे म्हटले आहे.

US Marines Deployment
El Nino Impact on Monsoon|मान्सूनवर 'एल निनो'चं सावट; २०२६ च्या उत्तरार्ध बळीराजाची चिंता वाढविणार

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष गेल्या काही आठवड्यांपासून तीव्र झाला आहे. अमेरिकन आणि इस्रायली सैन्य कारवायांनंतर इराणनेही गल्फ परिसरात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे. त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.

संकट प्रतिसादासाठी मरीन युनिट सक्रिय

अमेरिकेने पाठवलेले मरीन सैनिक हे जपानमध्ये तैनात असलेल्या 31 मरीन एक्स्पेडिशनरी युनिट या विशेष युनिटचा भाग आहेत. हे युनिट अमेरिकन मरीन कॉर्प्सचे एकमेव कायमस्वरूपी पुढील तैनातीवर असलेले युनिट मानले जाते.

हे युनिट जलद प्रतिसादासाठी तयार असते. युद्ध किंवा संकटाच्या काळात ते संघर्षग्रस्त भागातून नागरिकांची सुटका करणे, दूतावासांचे संरक्षण करणे तसेच इतर सैन्य दलांसाठी प्रवेशद्वार तयार करणे अशा महत्त्वाच्या मोहिमा पार पाडते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तैनातीचा उद्देश केवळ लष्करी कारवाई नसून, संभाव्य संकटांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयारी ठेवणे हा आहे.

US Marines Deployment
Dahisar Murder Attempt: मैत्रिणीवरून झालेल्या वादातून मित्रावर तलवारी-चाकूने हल्ला; तीन महिन्यांनंतर आरोपी अटकेत

अमेरिकेच्या ‌‘सेंटकॉम‌’ची मागणी

अमेरिकेच्या ‌‘युनायटेड स्टेट सेंट्रल कमांड‌’ने (सेंटकॉम) या अतिरिक्त सैन्याची मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मध्य पूर्वेतील संभाव्य संघर्ष वाढल्यास विविध पर्याय उपलब्ध राहावेत, यासाठी ही तैनाती करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या युद्धाच्या नियोजनात मरीन फोर्स उपलब्ध ठेवणे हा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे परिस्थितीनुसार त्यांचा वापर करण्याचे पर्याय खुले राहतात.

या निर्णयामुळे मध्य पूर्वेत अमेरिकेची लष्करी उपस्थिती आणखी वाढली आहे. वॉशिंग्टन विविध संभाव्य संकटांचा विचार करून लष्करी तयारी वाढवत असल्याचे संकेत यामधून मिळत आहेत.

US Marines Deployment
Sunetra Pawar: राजकारणात स्थिरावताहेत सुनेत्रा पवार!

इराणमध्ये नेतृत्व बदलानंतर तणाव

अमेरिकन-इस्रायली लष्करी मोहिमेच्या सुरुवातीला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा मोज्तबा खामेनी यांना नवा सर्वोच्च नेता घोषित करण्यात आले आहे. मात्र, ते जखमी असल्याच्या बातम्या समोर आल्या असून, ते सार्वजनिकरीत्या दिसलेले नाहीत.

तीन युद्धनौकांसह ‌‘ट्रिपोली‌’ समूहाची हालचाल

या मोहिमेत सहभागी असलेले नौसैनिक ‌‘ट्रिपोली ॲम्फिबिअस रेडी ग्रुप‌’ या युद्धनौका समूहाशी जोडलेले आहेत. या समूहात तीन प्रमुख युद्धनौका आहेत : ‌‘यूएसएस ट्रिपोली‌’ (एलएचए-7), ‌‘यूएसएस सॅन दिएगो‌’ (एलपीडी-22), ‌‘यूएसएस न्यू ओरलिन्स‌’ (एलपीडी-18) या जहाजांवरून मरीन सैनिकांना समुद्रातून थेट किनाऱ्यावर उतरवणे, हेलिकॉप्टर आणि लढाऊ साधनांची तैनाती करणे तसेच आपत्कालीन कारवाया करणे शक्य होते. त्यामुळे या जहाजांना सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news