पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आलं. याचा माेठा फटका आंतरराष्ट्रीय प्रवासालही बसला. आता कोरोना संकटावर मात करत जग पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत आहे. ( US consulates ) सर्वत्र जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. अशातच आता गेली दोन वर्षांहून अधिक काळ अमेरिकेला जाण्याच्या प्रतीक्षेत असणार्यांसाठी एक खूषखबर आहे. कारण कोरोना काळात कपात केलेले व्हिसामध्ये वाढ करण्याचा निर्णय अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाने घेतला आहे. १२ महिन्यांमध्ये आठ लाख व्हिसा जारी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले असल्याची माहिती वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ राजदूतांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना अमेरिकेच्या दुतावासातील वरिष्ठ अधिकारी डोनाल्ड हेफ्लिन यांनी सांगितले की, "पुढील १२ महिन्यांमध्ये आम्ही आठ लाख व्हिसा जारी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही तयारी केली आहे.यामाध्यमातून एच आणि एल व्हिसाची मागणी पूर्ण केली जाईल".
कोरोना काळात कर्मचार्यांची संख्या ५० टक्के केली होती. आता आम्ही भारतातील व्हिसा प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी कार्यालयातील कर्मचार्यांची संख्याही वाढविणार आहोत. हैदराबादमध्येही आम्ही कार्यालय सुरु करणार आहोत. सध्या नवी दिल्ली, मुंबई आणि कोलकातामधील कार्यालयात १०० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या हेल्पलाईन क्रमांक आणि ई मेलवर, व्हिसा हवा असणार्यांनी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा :
पाहा व्हिडीओ :