पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय सामन्यांत किंवा कसोटी सामन्यांत मेडन ओव्हर टाकणे तसे सोपे आहे. पण हे टी-२० क्रिकेटमध्ये सहजासहजी शक्य नाही. जगाला लिमिटेड ओव्हर क्रिकेटची ओळख झाली आणि कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचे मोठे आव्हान फलंदाजांसमोर उभे ठाकले. यामुळे सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये काही फलंदाज एका ओव्हर मध्ये २०-२५ धावा सहज काढताना दिसत आहेत. (Umran Malik)
२००७ च्या वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने ओव्हरच्या प्रत्येक बॉलला षटकार लगावला. त्यानंतर २००८ साली इंडियन प्रिमियर लिगची जगाला ओळख झाली. आयपीएलमध्ये प्रत्येक संघ बिग-हिटर म्हणजेच षटकार लगावणाऱ्या खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करण्यात आग्रही असतो. (Umran Malik)
सध्या क्रिकेट फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल आहे. तरीही आयपीएलमध्ये चार गोलंदाजांनी २०वी ओव्हर मेडन टाकण्याची दमदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या १५ व्या हंगामात नवखा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने ही कामगिरी केली आहे. उमरान मलिक सनराईजर्स हैदराबादकडून खेळत असून पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात त्याने २० वी ओव्हर मेडन टाकण्याची कामगिरी केली आहे. तर याअगोदर तीन गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती. (Umran Malik)
इरफान पठाणने आयपीएलमध्ये पहिल्यांदा २०वी ओव्हर मेडन टाकण्याची कामगिरी केली होती. त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामात ही कामगिरी केली होती. २००८ साली किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळताना मुंबई इंडियन्सच्या विरोधात त्याने ही कामगिरी केली होती.
मुंबई इंडियन्सला लसिथ मलिंगाने अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये तो फक्त मुंबई इंडियन्ससाठी खेळला. आयपीएलमध्ये २०वी ओव्हर मेडन टाकणारा लसिथ मलिंगा दुसरा बॉलर ठरला. त्याने डेक्कन चार्जेर्स या संघाविरूद्ध खेळताना २०वी ओव्हर मेडन टाकली होती. (Umran Malik)
आयपीएलमध्ये २०वी ओव्हर मेडन टाकणारा जयदेव उनादकट हा तिसरा गोलंदाज आहे. त्याने २०१७ साली सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध खेळताना मेडन टाकली होती. (Umran Malik)
जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला सनराईजर्स हैदराबादने संधी दिलीय. त्याने आयपीएलच्या या हंगामात सर्वांत वेगवान गोलंदाजी केली आहे. त्याने पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात २०व्या ओव्हर मध्ये ३ विकेट्स पटकावत मेडन ओव्हर टाकली होती. (Umran Malik)