Viral News: कुत्र्याचं करायचं काय... पळून गेलेल्या जोडप्याचं थाटामाटात होणार होतं लग्न; वधूच्या 'लाडक्या' वरून राडा, संसार मोडला

Viral News Dog And Wedding
Viral News Dog And Weddingphoto
Published on
Updated on

Wedding Called Off Due To Pet Dog: मोठ्या थाटामाटात सुरू असलेल्या लग्नात अचानक एक मोठा ट्विस्ट आला. वधूचा पाळीव कुत्रा वरपक्ष आणि वधूपक्षातील तुंबळ हाणामारीला कारणीभूत ठरला. अखेर दोन्ही पक्षाकडच्या लोकांनी लग्नच रद्दा करून टाकलं.

बुधवारी रात्री उत्तर प्रदेशातील फतेपूर जिल्ह्यात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार वधूचे कुटुंबीय हे प्रयागराजवरून खासगी बस आणि गाड्या करून आले होते. तर वधू पक्षाकडील लोकं पांपरिक पद्धतीनं वाजत गाजत लग्नस्थळी पोहचले होते. लग्नाचे प्राथमिक विधी सुरू होते. ते शांततेत पार पडले. मात्र त्यानंतर तुफान राडा झाला.

Viral News Dog And Wedding
Viral News: थरकाप उडवणारी घटना! शाळेत खेळता खेळता वाद झाला अन् मित्रांनी पाचवीच्या विद्यार्थ्याचे डोळे फोडले

वधू सुमित केसरवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघेजण रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी पळून जाऊन कानपूरमध्ये आर्य पद्धतीनं लग्न केलं होतं. मात्र दोन्हीकडच्या कुटुंबियांनी चर्चा केली. त्यानंतर वधूकडील कुटुंबीय थाटामाटात लग्न करण्यासाठी तयार झाले. यानंतर फतेहपूरमध्ये हा विवाह करण्याचं ठरलं.

कुत्रा भुंकला अन्...

ज्या दिवशी लग्न होणार होतं. त्या दिवशी सकाळी वातावरण तंग झालं. पहाटे चार वाजता दागिन्यांच्या प्रदर्शनाचे विधी पार पडले. दरम्यान, वधूचा पाळीव कुत्रा लग्नस्थाळाच्या इथं जवळच बांधून ठेवा होता. तो कुत्रा भुंकू लागला. त्याच्या भुंकण्यामुळं लग्नविधीत अडथळा निर्माण होत होता. अशावेळी वर पक्षाकडील एका तरूणानं या कुत्र्याला मारण्यास सुरूवात केली. याला वधू पक्षातील कुटुंबियांनी आक्षेप घेतला. यावेळी वादावादी झाली. या वादावादीचे पुढे हाणामारीत रूपांतर झालं.

Viral News Dog And Wedding
Viral Video: पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नको म्हटलं म्हणून तरुणाने लायटरने थेट नोझललाच आग लावली; धक्कादायक व्हिडिओ!

काठ्या, खुर्च्यांनी हाणामारी

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की दोन्ही पक्षांकडून हाणामारीत काठ्या, खुर्च्यांचा वापर करण्यात आला. वधूकडील शुभमन गुप्ता, ऋषभ केसरवाणी आणि संगिता देवी यांना दुखापत झाली. वरपक्षाकडील देखील काही लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आले. आता हे प्रकरण खागा पोलीस ठाण्यात पोहचलं आहे. यामुळं आता लग्न सोहळा स्थगित करण्यात आला आहे. जखमींना आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

Viral News Dog And Wedding
Shubman Gill Viral Video: अर्जुन तेंडुलकरच्या प्री वेडिंगमध्ये शुभमन गिल थिरकला? 'तो' Video होतोय तुफान व्हायरल

वधूचा नकार लग्न मोडलं

पोलिसांच्या तपासावेळी वधूनं तिला आता हे लग्न करायचं नसल्याचं सांगितलं. यानंतर पंचायतनं दोन्ही कुटुंबियांच्या वरिष्ठ लोकांना याची कल्पना दिली आहे. लग्नावेळी देण्यात आलेल्या बेटवस्तू आणि इतर गोष्टी परत करण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांनी आपापसात सेटलमेंट केली असून कोणीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news