Shubman Gill Viral Video: अर्जुन तेंडुलकरच्या प्री वेडिंगमध्ये शुभमन गिल थिरकला? 'तो' Video होतोय तुफान व्हायरल

Arjun Tendulkar Pre Wedding Gill Dance
Arjun Tendulkar Pre Wedding Gill Dancepudhari photo
Published on
Updated on

Arjun Tendulkar Pre Wedding Shubman Gill Dance: भारतीय संघ सध्या टी २० वर्ल्डकप मोहिमेवर असून तिथं टीम इंडियाचा रथ विजयीपथावर घोडदौड करत आहे. दरम्यान, वनडे संघाचा कर्णधार आणि टी २० वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेला शुभमन गिल हा आपला मित्र अर्जुन तेंडुलकरच्या लग्न सोहळ्यात बिझी आहे असं दिसतंय.

Arjun Tendulkar Pre Wedding Gill Dance
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? संघ बदलाची चर्चा

तो डान्स व्हायरल

शुभमन गिलचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडिओ अर्जुन तेंडुलकरच्या प्री वेडिंगमधील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शुभमन गिल या व्हिडिओत अनेकांच्या गराड्यात डान्स करताना दिसत आहे.

Arjun Tendulkar Pre Wedding Gill Dance
Sara Arjun: नजर हटणार नाही! सारा अर्जुनचा साडीतील मराठमोळा नखरा; पाहा खास फोटो

गिल पुन्हा चर्चेत

दरम्यान, शुशमन गिलच्या अवती भोवती अनेक जण डान्स करताना दिसत आहेत. त्यात काही मुलींचा देखील समावेश आहे. मात्र या व्हिडिओत तेंडुलकर कुटुंबातील कोणी व्यक्ती दिसत नाहीये. त्यामुळं हा अर्जुन तेंडुलकरच्या प्री वेडिंगमधीलच व्हिडिओ आहे याची पुष्टी होत नाही. असं असलं तरी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू नसलेला शुभमन गिल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सानिया चंढोक हिच्यासोबत पुढच्या महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. तेंडुलकर कुटुंबीय हे प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरमध्ये पोहचले असून अंबानी कुटुंबीयांनी प्री मॅरेज सेलिब्रेशनचं आयोजन केलं आहे.

अर्जुन आणि सानिया यांचे लग्न होणार याची चर्चा ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहे. त्यावेळी त्यांनी एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा देखील उरकून घेतला होता. जरी सारखपुडा हा अत्यंत खासगी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाला असला तरी अर्जुन आणि सानियाचा विवाह हा मोठ्या थाटामाटत होणार आहे. यात क्रिकेटपासून राजकारणी लोकांची रेलचेल असणार आहे.

अर्जुनची होणारी पत्नी सानिया ही Mr Paws Pet Spa & Store ची संस्थापक आहे. सानिया ही उद्योग क्षेत्राशी संबधित असलेल्या कुटुंबातून येते. तिची शौक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी देखील चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा हा ३ मार्च ते ५ मार्च दरम्यान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news