

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातील भीषण अपघातात पिकअप चालकासह एकाच कुटूंबातील ९ जण ठार झाले. सातजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर बरेली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. अपघात घटनेचा तपास पोलिस करत आहेत. (UP accident )
मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीतच्या गजरौला पोलीस स्टेशन परिसरात भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीने पहाटे एका झाडाला धडक दिली. यानंतर पिकअप महामार्गावर पलटी झाला. अपघाच जंगलभागात झाल्याने अपघातग्रस्तांना बचावकार्य मिळण्यास उशीर लागला. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोनजण गंभीर आहेत. या भीषण अपघातात पिकअपचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ही दुर्घटना पहाटे चारच्या सुमारास झाली. (UP accident), हरिद्वार येथे गंगा स्नानाला गोला कुटुंबीय गेले होते. परताना हा भीषण अपघात झाला.
हेही वाचलंत का?