Attack On Putin Residence: युक्रेनचा पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला, नरेंद्र मोदींनी ट्विट करून दिला हा सल्ला
Attack On Putin Residence: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी युक्रेनने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला करण्याचा रशियाने दावा केला होता. हे निवासस्थान मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग इथं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं की, 'रशियाच्या राष्ट्राध्यक्षकांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त वाचून चिंता वाटते. सध्या जे कुटनैतिक मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याचा पर्याय हा शांतता प्रस्थापित करण्याचा सर्वात योग्य पर्याय आहे. आम्ही सर्वांना या कुटनैतिक मार्गावर जास्त लक्ष केंद्रित करावे अशी विनंती करतो.'
९१ ड्रोनद्वारे हल्ला
रशियानं युक्रेनने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा दावा केला. रायटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी २८ - २९ डिसेंबर रोजी ९१ लाँग रेंज ड्रोन्स नोव्हगोर्ड भागात फायर करण्यात आले होते. रशियाच्या एअर डिफेन्सने त्यातील सर्व ड्रोन्स हे इंटरसेप्ट करून हा हल्ला हाणून पाडल्याचा दावा केला आहे.
चोख प्रत्युत्तर दिलं जाईल
लोव्हरोव्ह यांनी हा हल्ला दहशवादी हल्ला म्हणून संबोधला आहे. लाव्हरोव्ह यांनी रशिया युक्रेनसोबतच्या आपल्या वाटाघाटींबाबत आपल्या भूमिकेचा पुन्हा विचार करणार असल्याचं देखील सांगितलं. यावरून युक्रेनसोबतचं युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या कुटनैतिक चर्चांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही आधीच टार्गेट्स निवडले असल्याचे सांगितले आहे.
झेलेन्स्कींनी दावा फेटाळला
दरम्यान, युक्रेनने रशियाचे आरोप फेटाळून लावले असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशिया खोटं बोलत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की युक्रेनवरील पुढील हल्ले करण्यासाठी रशिया हे नॅरेटिव्ह वापरत आहे. ते कीव्हवर देखील हल्ला करण्याची शक्यता आहे.
झेलन्स्की यांनी पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला ही तयार केलेली स्टोरी आहे. रशियाला युद्ध थांबवण्यासाठी उतिच पावले उचलायची नसल्यानं त्यांनी ही स्टोरी तयार केली असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे.
युक्रेन असं करूच शकत नाही
लोकशाहीवर घाला घालणारा कोणताही हल्ला युक्रेन करू शकत नाही. उलट रशिया असं करू शकतो असा देखील आरोप त्यांनी केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायला देखील शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा वेळी तुम्ही देखील गप्प राहू नका अशी विनंती केली आहे.
जेव्हापासून रशियाने युक्रेवर हवाई हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तेव्हापासून युक्रेनमध्ये पॉवर कट करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कीव अन् उत्तर भागातील काही शहरांमध्ये हिटर आणि लाईट दोन्ही सेवा बंद आहेत. नागरिकाना हिटर आणि विजेशिवायच रहावं लागत आहे.

