Aadhaar App:
नवी दिल्ली : आता तुम्हाला आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) एक नवीन आधार अॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक आणि क्यूआर शेअरिंगचा समावेश आहे.
देशातील सुमारे १४० कोटी लोक आधार वापरतात आणि हे ॲप प्रत्येकासाठी खूप सोपा आणि सुरक्षित मार्ग घेऊन आले आहे. हे ॲप पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आता ते Google Play Store आणि Apple App Store दोन्हीवरून डाउनलोड केले जाऊ शकते. आता तुम्ही तुमच्या फोनमध्ये डिजिटल आधार सहज ठेवू शकता आणि गरज पडल्यास दाखवू शकता.
नवीन ॲपची सर्वात मोठी आणि उपयुक्त सुविधा म्हणजे आता कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड एकाच फोनमध्ये ठेवता येतात. यासाठी केवळ त्या सर्व सदस्यांचा नोंदणीकृत मोबाइल नंबर एकच असणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या फोनमध्ये ॲप डाउनलोड करण्याची किंवा डिजिटल आधार सांभाळण्याची गरज राहणार नाही.
ॲपमध्ये चेहरा ओळखण्याची (फेशियल रेकग्निशन) तंत्रज्ञान आहे. यासोबतच तुम्ही बायोमेट्रिक लॉक देखील लावू शकता जेणेकरून इतर कोणी तुमचा डेटा पाहू शकणार नाही. QR कोडद्वारे माहिती शेअर करता येते, ज्यामुळे गोपनीयता मजबूत होते.
ॲपची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती माहिती शेअर करायची आहे, हे तुम्ही स्वतः निवडू शकता. उदाहरणार्थ, फक्त नाव आणि फोटो दाखवायचा की संपूर्ण पत्ता आणि जन्मतारीख देखील. बँक असो वा सरकारी कार्यालय, QR कोड स्कॅन करून लगेच पडताळणी होते. इंटरनेट नसले तरीही, तुम्ही आधीच सेव्ह केलेले आधार पाहू शकता. ॲपमध्ये 'ॲक्टिव्हिटी लॉग' देखील आहे, ज्यामध्ये तुमचा आधार कधी आणि कुठे वापरला गेला हे कळते. यामुळे सुरक्षा आणखी वाढते.
नवीन आधार ॲप वापरण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
Play Store किंवा App Store वरून 'आधार ॲप' सर्च करून इन्स्टॉल करा.
ॲप उघडल्यावर आपली पसंतीची भाषा निवडा.
१२ अंकी आधार नंबर टाकून, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून पडताळणी करा.
यानंतर 'फेस ऑथेंटिकेशन'द्वारे आपला चेहरा स्कॅन करणे बंधनकारक असेल.
सुरक्षिततेसाठी ६ अंकी सुरक्षा पिन सेट करा.