Trump China Visit: चीनकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू आणि फोन ट्रम्प यांनी कचऱ्यात फेकले; धक्कादायक कारण आले समोर!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तीन दिवसांचा चीन दौरा संपला असला, तरी त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Trump China Visit
Trump China Visitfile photo
Published on
Updated on

Trump China Visit

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तीन दिवसांचा चीन दौरा संपला असला, तरी त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. डेटा चोरी आणि हेरगिरीच्या भीतीपोटी, अमेरिकेच्या शिष्टमंडळाने 'एअर फोर्स वन' या विशेष विमानात पाऊल ठेवण्यापूर्वीच चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व भेटवस्तू आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य तिथेच टाकून दिले.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मायदेशी परतण्याची तयारी करत असताना अमेरिकेच्या सुरक्षा पथकाने चीनकडून मिळालेल्या सर्व वस्तू एका ठिकाणी जमा केल्या. यामध्ये व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना वापरासाठी दिलेले खास 'बर्नर फोन्स', शिष्टमंडळाचे पिन आणि ओळखपत्रांसारख्या अनेक वस्तूंचा समावेश होता. सुरक्षेचा उपाय म्हणून या वस्तू अमेरिकेला सोबत नेण्याऐवजी, विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच त्या कचऱ्याच्या पेटीत फेकून देण्यात आल्या.

Trump China Visit
Xi Jinping | प्रतिस्पर्धी नको, भागीदार बना! राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन

विमानामध्ये चिनी वस्तूंना कडक बंदी

अमेरिकेच्या पत्रकारांसोबत प्रवास करणाऱ्या 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या पत्रकार एमिली गुडिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर या घटनेची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आम्हाला विमानामध्ये चीनशी संबंधित कोणतीही वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. आम्ही लवकरच अमेरिकेसाठी उड्डाण करणार आहोत."

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर आणि वस्तू फेकल्याच्या वृत्तावर व्हाईट हाऊस किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

उच्च-स्तरीय सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग

राजनैतिक तज्ज्ञांच्या मते, हा कोणताही तडकाफडकी घेतलेला निर्णय नव्हता, तर हा अमेरिकेच्या सुरक्षा धोरणाचा एक भाग आहे. जेव्हा जेव्हा अमेरिकी अधिकारी अशा देशांच्या दौऱ्यावर जातात जिथे हेरगिरीचा मोठा धोका असतो, तेव्हा प्रोटोकॉलनुसार तिथे मिळालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संवेदनशील वस्तू नष्ट केल्या जातात. यामुळे ट्रॅकिंग किंवा डेटा हॅकिंगची कोणतीही शक्यता उरत नाही.

९ वर्षांनंतर ट्रम्प यांनी केला चीन दौरा

विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प सुमारे नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चीनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी सातव्यांदा प्रत्यक्ष भेट झाली. 'झोंगनानहाई लीडरशिप कंपाउंड'मध्ये दोन्ही नेत्यांच्या अंतिम फेरीच्या बैठका पार पडल्यानंतर सुरक्षेचे हे कडक पाऊल उचलण्यात आले.

Trump China Visit
सुरक्षेला खिंडार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news