Teejan Bai passes away: पंडवानी गायिका, पद्मविभूषण तीजन बाई यांचे निधन; कलाविश्वावर शोककळा

प्रसिद्ध पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजन बाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
Teejan Bai passes away
Teejan Bai passes awayfile photo
Published on
Updated on

Teejan Bai passes away

रायपूर: प्रसिद्ध पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजन बाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७० वर्षांच्या होत्या. तीजन बाई यांच्या निधनामुळे छत्तीसगडसह संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि कला जगतावर शोककळा पसरली आहे.

तीजन बाई गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारपणामुळे रायपूर 'एम्स'मध्ये उपचार घेत होत्या. आज पहाटे ३:१५ च्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

सामाजिक बंधने झुगारून जागतिक मंचावर घेतली भरारी

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात १९५६ मध्ये जन्मलेल्या तीजन बाई यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षाचा आणि जिद्दीचा होता. महाभारतातील कथांवर आधारित असणाऱ्या 'पंडवानी' या पारंपरिक लोककलेला त्यांनी केवळ जिवंत ठेवले नाही, तर तिला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

Teejan Bai passes away
Sanchita Ugale death|'नाही छोटू तू माझी आवडती होतीस', संचिताचा सहकलाकार सोराब बेदीने केला खुलासा, 'आम्ही भेटणार होतो तोपर्यंत... '

ज्या काळात पंडवानी गायनाच्या 'कापालिक शैली'वर केवळ पुरुषांचे वर्चस्व होते, अशा काळात तीजन बाई यांनी सर्व रूढी-परंपरा झुगारून या क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात त्यांना प्रचंड सामाजिक विरोध आणि बंधनांचा सामना करावा लागला. मात्र, त्यांचा खणखणीत आवाज, दमदार अभिनय, अंगीभूत कला आणि हातात तंबोरा घेऊन जेव्हा त्या मंचावर उतरत, तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जात.

पाच दशकांचा सुवर्णकाळ

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर देशातच नव्हे, तर आशिया आणि युरोपसह जगभरात छत्तीसगडच्या मातीची कला पोहोचवली. सामाजिक अडचणींवर मात करत त्यांनी पंडवानी लोककलेला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या या प्रवासाने कलाकारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

सर्वोच्च नागरी सन्मान

लोकसंस्कृती आणि कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी तीजन बाई यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना पद्मश्री (१९८८), पद्मभूषण (२००३), पद्मविभूषण (२०१९) आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने लोककलेचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Teejan Bai passes away
Prasad Sawkar Passes Away | गोव्यातील प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक पद्मश्री प्रसाद सावकार यांचे निधन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news