Prasad Sawkar Passes Away | गोव्यातील प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक पद्मश्री प्रसाद सावकार यांचे निधन

पणजी येथील स्मशानभूमीत गुरुवारी होणार अंत्यसंस्कार
Padmashri Prasad Sawkar Demise
Padmashri Prasad SawkarPudhari
Published on
Updated on

Padmashri Prasad Sawkar Demise

पणजी : गोव्याचे प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे बुधवारी (दि.१७) निधन झाले. टोका करंजाळे पणजी येथे त्यांचा निवास होता. मृत्युसमयी त्यांचे वय 98 वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार (दि.१८) सकाळी १०.३० वाजता पणजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एक जागतिक दर्जाचे नाट्य कलाकार आणि एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक म्हणून त्यांची ओळख होती. ‌मुंबईसह महाराष्ट्रात व गोव्यात त्यांनी अनेक प्रसिद्ध संगीत नाटकांमध्ये मुख्य गायक नटाची भूमिका वठवली. त्याचबरोबर अनेक स्पर्धांचे परीक्षण केले.

अनेक गाण्याच्या मैफिलीत गायन केले. अनेकांना मार्गदर्शन केले. एक नावाजलेले नाट्यकर्मी आणि गायक कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते . भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news